Gorewada Udyan 01- Uddhav Thackeray
Gorewada Udyan 01- Uddhav Thackeray

गोरेवाड्याला मिळाला मुख्यमंत्र्यांना झालेल्या व्याघ्र दर्शनाचा लाभ..

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सफारीला येताना पर्यटकांनी मास्क, सॅनिटायझर आणणे गरजेचे आहे. तसेच दहा वर्षाखालील व ६५ वर्षावरील पर्यटकांनी सफारीला येणे टाळावे, असे आवाहन विभागीय वनाधिकारी प्रमोद पंचभाई यांनी केले आहे. wildgorewada.com या वेबसाइटवर बुकिंग करता येणार आहे.

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय उद्यानाचे लोकार्पण काल केले. लोकार्पणाच्या दिवशीच त्यांना व्याघ्र दर्शन झाले. त्यामुळेच की काय, आज पहिल्याच दिवशी हे उद्यान बघण्यासाठी पर्यटकांनी तुफान गर्दी केली. आज सकाळच्या दोन फेऱ्या वगळता सर्वच फेऱ्या हाऊसफुल्ल होत्या. 

मुख्यमंत्र्यांना जंगल सफारीत वाघ, बिबट आणि अस्वल दिसले. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे पर्यटंकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली. आज बुधवारी सुटीचा दिवस नसतानाही गोरेवाडा हाऊसफुल्ल झाले होते. तब्बल २५९ पर्यटकांनी भेट दिली आहे. १९ जणांनी ऑनलाइन बुकिंग केले होते. वेळेवर आलेल्या अनेक पर्यटकांना बुकिंग मिळाले नसल्याने त्यांना परत जावे लागले. 

गोरेवाडा अगदी शहराला लागून आहे. अवघ्यात २० मिनिटाच्या आत पर्यटकांना तेथे पोहोचता येते. आपल्या शहराजवळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान झाल्याने अनेकांनी पहिल्याच सफारीला जाण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार सकाळीच ६.३० वाजता उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ आले आणि स्पॉट बुकिंग केल्याचे एका पर्यटकाने सांगितले. पहिल्याच सफारीत बिबट आणि वाघाचे दर्शन झाल्याने सुखावल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उद्यानात पर्यटकांच्या भ्रमंतीसाठी तीन बस आहेत. आज गर्दी वाढल्याने त्या कमी पडल्या. कारण अनेक पर्यटकांना बुकिंग न मिळाल्याने घरी परतावे लागले. मात्र, २५९ पर्यटकांच्या माध्यमातून ६२ हजार १०० रुपये भ्रमंतीतून मिळाले.  

मास्कची सक्ती 
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सफारीला येताना पर्यटकांनी मास्क, सॅनिटायझर आणणे गरजेचे आहे. तसेच दहा वर्षाखालील व ६५ वर्षावरील पर्यटकांनी सफारीला येणे टाळावे, असे आवाहन विभागीय वनाधिकारी प्रमोद पंचभाई यांनी केले आहे. wildgorewada.com या वेबसाइटवर बुकिंग करता येणार आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com