माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री म्हणाले, सोशल डिस्टन्स पाळत असाल तरच येईन... - former union minister of state for home affairs said i will come only if you observe social distance | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री म्हणाले, सोशल डिस्टन्स पाळत असाल तरच येईन...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 18 मे 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले. ते बघून त्यांनी समाधान व्यक्त केले आणि यानंतरही जोपर्यंत कोरोना आपल्या देशातून हद्दपार होत नाही, तोपर्यंत लोकांनी असाच संयम पाळणे गरजेचे असल्याचे सांगितले.

नागपूर : कोरोनाच्या उद्रेकाने आताशा प्रत्येक जण घाबरलेला आहे. दुसऱ्या लाटेचा प्रकोप कमी होत आला असला Outbreaks appear to be exacerbated during this time तरी, तिसरी लाट Third Wave येण्याची शक्यता तज्‍ज्ञांकडून वर्तविली गेली आहे. त्यामुळे ही शक्यता बघता कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही सोशल डिस्टंसिंग social distancing पाळत असाल, तरच मी येईन, अन्यथा नाही, असे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर Hansaraj Ahir म्हणाले. 

यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे काल येथील प्रतिष्ठित नागरिक महेश गायकवाड यांच्या वडिलांचे निधन झाले. गायकवाड कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी हंसराज अहिर त्यांच्या घरी गेले होते. तेथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले. ते बघून त्यांनी समाधान व्यक्त केले आणि यानंतरही जोपर्यंत कोरोना आपल्या देशातून हद्दपार होत नाही, तोपर्यंत लोकांनी असाच संयम पाळणे गरजेचे असल्याचे सांगितले. वणी तालुका हा चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे. त्यामुळे लोकांनी विनाकारण जिल्ह्याच्या बाहेर जाण्याचे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

ंआताशा जरी कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यूसंख्या कमी होत असली, तरी मागील काळात स्थिती भयंकर होती. जिकडे तिकडे बेड्स, रेमडेसिव्हिर आणि इतर औषधांचा तुटवडा होता. देशभर कोरोनाची दहशत माजली आहे. गेले १५-२० दिवस आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी अतिशय वाईट गेले. पण आता स्थिती सुधारत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही. सरकारने घालून दिलेले निर्बंध पाळा. गर्दी करू नका, मास्कचा वापर करा. असे केल्याने पाहता पाहता आपण कोरोनाला हद्दपार करू शकू, असे अहिर म्हणाले. 

हेही वाचा : रेमडेसिवरच्या काळाबाजारप्रकरणी डॉक्टरला अटक; औषध दुकानदारच भावाच्या मदतीने करीत होता काळाबाजार

अशा महामारीमध्ये संयम ठेवण्याची गरज आहे. प्रशासन आपल्यासाठी झटते आहे. आपणही प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. अशा काळात अफवांचेही पेव फुटते. पण नागरिकांनी अधिकृत माहितीवर विश्‍वास ठेवावा. आपल्या जवळपासच्या लोकांमध्ये जागृती करावी. कोरोनाची थोडीही शंका वाटल्यास ताबडतोब जाऊन चाचणी करून घ्यावी. जेणेकरून वेळेवर उपचार मिळतील आणि स्थिती गंभीर होणार नाही, असेही अहिर यांनी उपस्थितांना सांगितले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख