आरमोरीत माजी आमदाराच्या पुत्राची डॉक्‍टरला मारहाण, पोलिसांनी केली अटक... - former mlas son beats doctor in armori police arrest him | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

आरमोरीत माजी आमदाराच्या पुत्राची डॉक्‍टरला मारहाण, पोलिसांनी केली अटक...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 13 मे 2021

डॉ. मारबते हे शासकीय काम करीत असताना त्यांच्यावर हल्ला करत धाक दाखवून त्यांना शासकीय कामापासून परावृत्त केले म्हणून डॉ. मारबते यांनी आरमोरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या तक्रारीवरून लॉरेन्स गेडाम याच्याविरुद्ध आरमोरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला

आरमोरी : आरमोरी येथे कोविड सेंटरवर (At the Covid Center at Armory) कार्यरत असलेले नोडल ऑफिसर डॉ. अभिजित मारबते (Nodal Officer Dr. Abhijeet Marbate) यांना आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आनंदराव गेडाम (Former MLA Anandrao Gedam) यांचा मुलगा लॉरेन्स गेडाम याने कोविड केअर सेंटरवरच मारहाण केली. या प्रकरणी डॉ. मारबते यांच्या तक्रारीनंतर लॉरेन्स गेडाम याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल (Lawrence Gedam was charged by police) करून त्याला अटक केली आ)हे.

सविस्तर वृत्तानुसार, उपजिल्हा रुग्णालय आरमोरी अंतर्गत आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह येथील कोविड केअर सेंटरमध्ये नोडल ऑफिसर म्हणून कार्यरत शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित मारबते त्यांच्या सहकाऱ्यासह कोविड रुग्णांची तपासणी व औषधी देण्याचे काम करत होते. दरम्यान काल, बुधवारी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास लॉरेन्स आनंदराव गेडाम (वय २०, रा. आरमोरी) याने रुग्णाला औषध देण्याच्या कारणावरून डॉ. अभिजित मारबते यांच्याशी वाद घालून त्यांना अश्‍लील शिवीगाळ केली व त्यांच्या अंगावर धावून जात चेहऱ्यावर व कानावर थापडा मारल्या.

डॉ. मारबते हे शासकीय काम करीत असताना त्यांच्यावर हल्ला करत धाक दाखवून त्यांना शासकीय कामापासून परावृत्त केले म्हणून डॉ. मारबते यांनी आरमोरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या तक्रारीवरून लॉरेन्स गेडाम याच्याविरुद्ध आरमोरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पंकज बोडसे करीत आहेत.

हेही वाचा : जि.प. शिक्षकांनी दिले कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलिंडर, व्हॉट्सॲप ग्रुपमधून केली मदत...
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख