अधिकाऱ्याला अश्‍लिल शिवीगाळ, माजी मंत्री रणजित कांबळेंवर गुन्हा दाखल...

आमदार आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या कथित संभाषणाची क्‍लिप जिल्ह्यात व्हायरल झाली आहे. या क्‍पिलमध्ये आमदारांनी केंद्राबाबत त्यांना विचारले नसल्याबाबत रोष व्यक्‍त केल्याचे ऐकायला मिळते. तर लॉकडाउन असताना या केंद्रांवर गर्दी होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
Ranjeet Kamble Wardha
Ranjeet Kamble Wardha

वर्धा : माझ्या देवळी विधानसभा मतदारसंघात (Deoli Assembly constituency) आरटीपीसीआर केंद्र सुरू करताना मला का सांगितले नाही. राजकारण करत आहे का, लॉकडाऊन (Lock Down) असताना लोकांना घरात बसवता आणि केंद्र कसले सुरू करता, अशा प्रश्‍नांची सरबत्ती करीत अश्‍लिल शिवीगाळ केल्याची तक्रार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले (District Health Officer Dr. Ajay Dawle) यांनी माजी मंत्री, आमदार रणजित कांबळे (Mla Ranjeet Kamble) यांच्या विरोधात केली. त्यानंतर रात्री उशिरा रणजित कांबळे यांच्या विरोधात वर्धा शहर पोलिस ठाण्यात (Wardha City Police Station) आरोग्य कर्मचारी, अधिकारी आरोग्य संस्था कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

कोविडचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागाच्यावतीने देवळी विधानसभा क्षेत्रातील नाचणगाव येथे आरटीपीसीआर चाचणी केंद्र सुरू केले. केंद्र सुरू करताना आमदार रणजित कांबळे यांना विचारणा न केल्याने आमदारांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना फोनवरून संताप व्यक्त केला. या संभाषणात त्यांनी अश्‍लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप जिल्ह्यात व्हायरल झाली आहे. या प्रकरणी मेग्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी संघटना, राजपत्रित कर्मचारी संघटना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्यावतीने पोलिसांत तक्रार केरण्यात आली. कांबळे यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही, तर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोरोना काळात काम करणार नाही, अशी भूमिका आरोग्य विभागाकडून घेण्यात आली आहे. यावर पोलिस प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ज्या भागांत कोरोना रुग्ण वाढत आहेत, त्या भागांतील नागरिकांच्या चाचण्या करण्याचा निर्णय आरोग्य विभागाकडून घेण्यात आला. त्यानुसार नाचणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात चाचणी सुरू केली. याची माहिती आमदार रणजित कांबळे यांना मिळताच त्यांनी प्रारंभी येथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. येथून त्यांना आरोग्य अधिकाऱ्यांचे नाव कळताच त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना दूरध्वनी केला व लॉकडाऊन असताना केंद्र सुरू करून राजकारण करता काय, माझ्या क्षेत्रात निर्णय घेताना मला विचारण्याची गरज नाही काय, अशी विचारणा करत थेट अश्लील शिवीगाळ केली. आमदार आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या कथित संभाषणाची क्‍लिप जिल्ह्यात व्हायरल झाली आहे. या क्‍पिलमध्ये आमदारांनी केंद्राबाबत त्यांना विचारले नसल्याबाबत रोष व्यक्‍त केल्याचे ऐकायला मिळते. तर लॉकडाउन असताना या केंद्रांवर गर्दी होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

व्हायरल झालेली क्‍लिप अपूर्ण आहे. लॉकडाऊन असताना केवळ काहींनी राजकारण करून येथील शाळेत चाचणी केंद्र सुरू केले. प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिलेच एक केंद्र सुरू आहे. सर्वत्र गर्दी टाळण्याच्या सूचना असताना तेथे गर्दी होत आहे. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून योग्य उत्तर मिळाले नाही. 
- रणजित कांबळे, आमदार, देवळी-पुलगाव विधानसभा. 

हायरिस्क असलेल्या परिसरात आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काम सुरू आहे. यात राजकारणाचा काहीही भाग नसताना आमदारांनी स्वत:वरील ताबा सोडत अशोभनीय कृत्य केले. पोलिसात तक्रार झाली आहे. त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर आरोग्य यंत्रणा उद्यापासून काम बंद करणार. 
- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी वर्धा. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com