कोरोनाशी लढण्यासाठी मंत्रीही देत नाहीत निधी, मोजक्याच आमदारांनी दिले पत्र...

पालकमंत्री कोरोना संदर्भात नियमित बैठका घेत असून आवश्यक सुविधा उभ्या करण्याच्या सूचना प्रशासनाला देत आहेत. या सुविधा उभ्या करण्यासाठी निधीची मोठ्या प्रमाणात गरज आहे. येत्या काळात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Corona NGP Ziro Mile.
Corona NGP Ziro Mile.

नागपूर : कोरोनाशी दोन हात करताना काय केले पाहिजे आणि काय करू नये, यावर आपल्या राज्यातले मंत्री, आमदार (Minister and MLA) सातत्याने जनतेला मार्गदर्शन करतात. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Guardia Minister Dr. Nitin Raut) सतत त्यासाठी बैठका घेत आहेत. पण राज्य सरकारने आमदारांना १ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी कोरोनाच्या लढ्यासाठी (the battle of Corona) दिला आहे. तो निधी देण्यासाठी मात्र सर्व जण हात आखडता घेत आहेत. पालकमंत्री डॉ. राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या इतर काही आमदारांनी अद्याप या निधीसाठी पत्र दिले नसल्याची माहिती आहे. 

कोरोनाशी लढा देण्याकरता आमदार निधीतील १ कोटी रुपये देण्याच्या सूचना शासनाच्यावतीने करण्यात आल्या. मंत्रिमंडळातील सदस्य जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी एकही रुपया देण्याची तयारी अद्याप दर्शविली नाही. मागील वेळीही काही मंत्र्यांनी निधी दिला नव्हता. त्यामुळे शासनाच्या सूचनांना मंत्र्यांकडून तिलांजली देण्यात येत असल्याचे दिसते. मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या निर्णयाची मंत्र्यांकडूनच अंमलबजावणी होत नसेल तर इतरांचे काय, असा सवालही उपस्थित होत आहे.

कोरोना लढ्याकरता निधीची कमी पडता कामा नये म्हणून आमदार निधीतील १ कोटी रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. तसा आदेशही नियोजन विभागाकडून काढण्यात आला. विशेष म्हणजे याकरिता १ कोटीने आमदार निधी वाढवून ४ कोटी करण्यात आला. १ कोटीचा निधी कोरोना लढ्याकरता आवश्यक साहित्य खरेदीवर खर्च करायचा आहे. परंतु शासनाच्या निर्णयाला मंत्रिमंडळातील सदस्यांकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या विरोध होत असल्याचे चित्र आहे. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत व पशुसंवर्धन तथा क्रीडा मंत्री सुनील केदार यांनीही अद्याप हा निधी दिलेला नाही. 

विशेष म्हणजे पालकमंत्री कोरोना संदर्भात नियमित बैठका घेत असून आवश्यक सुविधा उभ्या करण्याच्या सूचना प्रशासनाला देत आहेत. या सुविधा उभ्या करण्यासाठी निधीची मोठ्या प्रमाणात गरज आहे. येत्या काळात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात लहान बालकही प्रभावित होण्याचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे याकरिता वेगळी व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठीही निधीची गरज भासणार आहे. परंतु लोकप्रतिनिधी त्यातही सरकारमधील सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळाले नाही, तर हा लढा देणे अवघड होणार आहे. मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या टप्प्यातही आमदार निधीतील २० लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळीही मंत्र्यांनी निधी दिला नव्हता, हे उल्लेखनीय.

आतापर्यंत नागपूर जिल्ह्यातील १६ पैकी केवळ ६ ते ७ आमदारांनीच कोरोना लढ्यासाठी निधी देण्याचे पत्र दिले आहे. उर्वरित पुढाऱ्यांना अद्याप त्यासाठी वेळ मिळालेला दिसत नाहीये. कोरोनाच्या लढ्यासाठी सरकारने अतिरिक्त निधी दिला आहे आणि यासाठीच तो खर्च करावा, असे स्पष्ट निर्देशही दिले आहेत. तरीही मंत्री आणि आमदारांचा हात सैल सुटत नसल्याने जनतेमध्ये त्यांच्याप्रति रोष बघायला मिळत आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com