Sanjeev Kumar Divisonal Commissioner nagpur
Sanjeev Kumar Divisonal Commissioner nagpur

विभागीय आयुक्त म्हणाले, लसीकरणासाठी वर्गणी गोळा करू नका...

महापौर दयाशंकर तिवारी यांनी खासदार, इतर लोकप्रतिनिधी, नगरसेवक तसेच दानदात्यांनाही याकरिता महापौर निधीत पैसे गोळा करण्याचे आवाहन केले आहे. संजीव कुमार यांच्या आवाहनानुसार गोळा करण्यात आलेल्या निधीचा वापर इतर वैद्यकीय सामग्री व आरोग्य यंत्रणेसाठी केले जाऊ शकतो.

नागपूर : कोरोनाचे लसीकरण (Corona vaccination) महानगरपालिकेच्या निधीतून करण्याची तयारी महापौर दयाशंकर तिवारी (Meyor Dayashanar Tiwari) यांनी चालवली होती. त्यावर कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी आक्षेपही घेतला होता. पण आता महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सेवाभावी संस्था यांनी लसीकरणासाठी वर्गण गोळा करू नये, असे विभागीय आयुक्तांनीच सांगितल्यामुळे (As stated by the Divisional Commissioner) महापौरांच्या मनसुब्यांवर पाणी फिरल्याचे मानले जात आहे. 

केंद्र व राज्य सरकारमार्फत मोफत लसीकरण केले जात असल्याने महानगर पालिका, स्‍थानिक स्वराज संस्था तसेच सेवाभावी संस्थांनी याकरिता निधी गोळा करू नये, असे निर्देश नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले आहे. त्यामुळे महापौरांची मनपाच्या स्वनिधीतून लसीकरणाची घोषणा हवेतच विरणार आहे. 

सर्वांच्या लसीकरणासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांनी महापालिकेच्या स्वनिधीतून लसीकरण करणाची घोषणा केली होती. याकरिता मुख्यमंत्र्यांकडे आयुक्तांच्या माध्यमातून परवानगी मागितली आहे. आयुक्तांनी राज्याच्या सचिवांसोबत याबाबत चर्चा केली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे यांनी केला होता. मनपाच्या स्वनिधीतून केलेल्या घोषणेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल गुडधे यांनीही आक्षेप घेतला आहे. महापौर स्‍वस्त प्रसिद्धीसाठी नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही गुडधे यांनी केला होता.
 

आता विभागीय आयुक्तांनीच स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी संस्थांना निधी गोळा करू नये, असे बजावले असल्याने महापौर तोंडघशी पडले आहेत. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी लस खरेदीसाठी एक कोटी रुपये देण्याचे पत्र महापौरांना सोपविले आहे.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी खासदार, इतर लोकप्रतिनिधी, नगरसेवक तसेच दानदात्यांनाही याकरिता महापौर निधीत पैसे गोळा करण्याचे आवाहन केले आहे. संजीव कुमार यांच्या आवाहनानुसार गोळा करण्यात आलेल्या निधीचा वापर इतर वैद्यकीय सामग्री व आरोग्य यंत्रणेसाठी केले जाऊ शकतो. मात्र या निधीतून लस खरेदी करता येणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com