नाराज निरूपम, टोकस यांना संघटनेत पुन्हा मानाचे स्थान

वेणुगोपाल यांनी आज जारी केलेल्या नियुक्ती पत्रामध्ये प्रदेश उपाध्यक्षपदी टोकस यांच्याव्यतिरिक्त नागपूरचे नाना गावंडे, यवतमाळचे सचिन नाईक आणि बुलडाण्याचे संजय राठोड यांचा समावेश आहे.
Sanjay Nirupam - Charulata Tokas
Sanjay Nirupam - Charulata Tokas

नागपूर : कॉंग्रेसवर नाराज असलेले आणि पक्षापासून दुरावत चाललेले माजी पदाधिकारी संजय निरूपम आणि महिला कॉंग्रेस कमिटीच्या माजी प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस यांना पक्षाने पक्ष संघटनेत पुन्हा मानाचे स्थान देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. कॉंग्रेसचे सचिव के.सी. वेणूगोपाल यांनी आज या दोघांच्याही नियुक्तीचे पत्र जाहीर केले आहे. 

चारुलता टोकस यांना प्रदेश उपाध्यक्षपदी तर संजय निरुपम यांना महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सदस्य बनवण्यात आले आहे. वेणुगोपाल यांनी आज जारी केलेल्या नियुक्ती पत्रामध्ये प्रदेश उपाध्यक्षपदी टोकस यांच्याव्यतिरिक्त नागपूरचे नाना गावंडे, यवतमाळचे सचिन नाईक आणि बुलडाण्याचे संजय राठोड यांचा समावेश आहे. तर सदस्यांमध्ये निरूपम यांच्या व्यतिरिक्त एकनाथ गायकवाड आणि जनार्दन चांदुरकर यांचा समावेश करण्यात आला आहे. यांपैकी नाना गावंडे हे नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत. जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. 

यवतमाळ जिल्हयाचे भूमिपुत्र, अखिल भारतीय कॅाग्रेस कमिटीचे सचिव सचिन नाईक सध्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यासोबत उत्तरप्रदेशमध्ये सहप्रभारी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव पदावर कार्यरत आहेत. तसेच त्यांनी एनएसयुआय, युवक कॅाग्रेस, राजीव गांधी पंचायती राज संघटन, अखिल भारतीय कॅाग्रेस कमिटी इत्यादी ठिकाणी विविध पदांवर यशस्वीपणे कार्य केले आहे. त्यांच्या निवडीमुळे यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त होण्यास बळ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. 

आंदोलक शेतकरी नेते नाना पटोले प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाल्यापासून राज्यातील कॉंग्रेसमध्ये जोश बघायला मिळत आहे. प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच नागपुरात झालेले त्यांचे स्वागत आणि भंडारा जिल्ह्यात त्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काढलेला मोर्चा चर्चेचा विषय ठरला. प्रदेशाध्यक्षपदाची कमान हाती घेतल्यापासून त्यांचा प्रभाव जाणवत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारीही त्यांनी सुरू केली आहे. नानांच्या टीममध्ये आता अनुभवी आणि नव्या दमाचे असे सदस्य आले आहेत. २०१४ नंतर केंद्रासह अनेक राज्यांतील सत्ता काँग्रेसने गमावली. मात्र, २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथा पालथीनंतर महाराष्ट्रातील सत्तेत काँग्रेस सहभागी झाली. आता काँग्रेसने पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com