सुनील केदार- राजेंद्र मुळक- नाना गावंडे यांच्यात मतभेद 

सध्या जिल्हा परिषदेत कृषी व पशुसंवर्धन, शिक्षण व वित्त, बांधकाम व आरोग्य या विषय समितीवर सभापतीची निवड होणे बाकी आहे.
nagpur congress
nagpur congress

नागपूर : वीस दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरही सभापतींना अद्याप विषय समितीचे वाटप करण्यात आलेले नाही. तीन दिवसांपुर्वी झालेल्या विशेष सभेत अध्यक्षांना वाटपाचे अधिकार देण्यात आले होते. अध्यक्षांनी दोन, तीन दिवसांत हे खाते वाटप होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आजही खाते वाटप झाले नाही. 

मंत्री सुनील केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक आणि नाना गावंडे यांच्यातील मतभेदामुळेच विषय समित्यांचे वाटप रखडल्याची चर्चा दबक्‍या आवाजात सुरु आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळेच बहुमत असतानाही विषय समितीचे वाटप रखडल्याचे चित्र सध्या जिल्हा परीषदेत आहे.

विषय समिती वाटपावरून सभापती तापेश्‍वर वैद्य आणि भारती पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. सभापती पद न मिळाल्याने नाना कंभाले आणि शांता कुमरे यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. दोन समित्यांवर सदस्य करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाने केला तरी यात फारसे यश आले नसल्याचे सांगण्यात येते. विषय समित्यांवरून ही नाराजी अधिक वाढण्याची भीती पक्षाला आहे. जिल्हा परिषदेच्या तीन सभापतींना अजूनही समितीच्या वाटपाची प्रतीक्षा आहे. हे तीनही सभापती कॉंग्रेसच्या गोटातील आहे. सोमवारी झालेल्या सभेत खातेवाटप होण्याची अशी अपेक्षा होती. मात्र ऐनवेळी हा निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षांना दिल्याने पुन्हा उलटसूलट चर्चा आहे. तिकडे समित्यांवरील सदस्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र अद्याप सभापतींचा पत्ता नाही.

सध्या जिल्हा परिषदेत कृषी व पशुसंवर्धन, शिक्षण व वित्त, बांधकाम व आरोग्य या विषय समितीवर सभापतीची निवड होणे बाकी आहे. आरोग्य आणि बांधकाम हे विभाग सहसा उपाध्यक्षांकडेच राहतात. त्यामुळे मनोहर कुंभारे या दोन्ही समित्यांचे सभापती होणार असल्याचे जवळपास निश्‍चित आहे. इतर समितीबाबात संभ्रम कायम आहे. सभापती न ठरल्याने विषय समित्यांच्या बैठकीही अडल्यात. योजनांच्या अंमलबजावणीसाठी विषय समितीची मंजुरी आवश्‍यक आहे. सभापती नसल्याने अनेक विषय प्रलंबित आहेत. मंत्री केदार आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, नाना गावंडे यांच्यातील मतभेदामुळेच विषय समित्यांचे वाटप रखडल्याचे सांगण्यात येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com