दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी श्रीनिवास रेड्डीला जामीन

या प्रकरणावरील पुढील सुनावणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निश्‍चित करीत प्रकरणाचे तपासादरम्यानचे कागदपत्र सादर करण्याचेसुद्धा नमूद केले आहे. त्याच्यावर दाखल गुन्हा रद्द करावा या विनंतीसह त्यांनी नागपूर खंडपीठात याचिकासुद्धा दाखल केली असून ती प्रलंबित आहे.
Deepali Chavan
Deepali Chavan

नागपूर : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील आरएफओ दीपाली चव्हाण (RFO Deepali Chavan from Melghat Tiger Reserve) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणातील एक आरोपी प्रकल्प संचालक तथा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रामासुब्बा रेड्डी (Shriniwas Ramasubba Reddy) यांना प्रथम निलंबित करण्यात आले होते आणि नंतर नागपुरातून त्यांना अटक करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. (Nagpur bench of Mumbai High Court granted interim bail)

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात जामिनासाठी त्यांनी नागपूर खंडपीठामध्ये अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर करीत अर्ज निकाली काढला आहे. या अर्जावर न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या समक्ष काल सुनावणी झाली. अर्जानुसार, दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर रेड्डी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर रेड्डी यांचं निलंबन करण्यात आलं होतं. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात काही अधिकाऱ्यांची नावं लिहिलेली होती. याच प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे रेड्डी यांचं अखेर निलंबन करण्यात आलं होतं. अखेर चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. 

मात्र, प्रकरणामध्ये प्रथम दर्शनी कुठलाही आरोप नाही किंवा थेट आरोप नाही. तसेच, त्यांचे नाव तक्रारीत नसल्याच्या आधारावर न्यायालयात त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने सर्व बाजू लक्षात घेता ५० हजार रुपयांच्या बंधपत्रासह अंतरिम जामीन मंजूर केला. तसेच, पासपोर्ट जप्त करीत नागपूर न सोडण्याचेही आदेशामध्ये नमूद केले आहे. तसेच, प्रत्येक सोमवारी सदर पोलिस ठाण्यामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश दिले. 

या प्रकरणावरील पुढील सुनावणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निश्‍चित करीत प्रकरणाचे तपासादरम्यानचे कागदपत्र सादर करण्याचेसुद्धा नमूद केले आहे. त्याच्यावर दाखल गुन्हा रद्द करावा या विनंतीसह त्यांनी नागपूर खंडपीठात याचिकासुद्धा दाखल केली असून ती प्रलंबित आहे. रेड्डीतर्फे ॲड. अथर्व मनोहर, ॲड. रोहन देव आणि ॲड. अक्षय नाईक यांनी बाजू मांडली.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com