उपराजधानीत ११२२ जणांवर उपचारापूर्वीच घातली कोरोनाने झडप...

कोरोनाचा संशय आल्यानंतर चाचणीला उशीर झाल्यामुळे किंवा घरीच उपचार करण्याची चूक भोवल्यामुळे कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी १ हजार १२२ कोरोनाबाधितांचे रुग्णालयात येण्यापूर्वीच वाटेतच मृत्यू झाले. यांना कोरोनावरील उपचार घेताच आले नाही.
Corona NGP Ziro Mile
Corona NGP Ziro Mile

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन करू शकले नाही. इतर जिल्ह्यांतून आणि राज्यांतूनही नागपुरात उपचारासाठी येणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची (Coronary artery disease patients coming to Nagpur for treatment) संख्या मोठी आहे. अशा रुग्णांपैकी वाटेतच अनेक जण दगावले आहेत. याला कारण म्हणजे चाचणी केल्यानंतर अहवाल यायला उशीर होतो. (The report is late) त्यामुळे बऱ्याच जणांनी घरी उपचार घेतले आणि तीन किंवा चार-पाच दिवसांनंतर अहवाल आल्यावर रुग्णालयांकडे निघाले. पण नागपुरात अशा ११२२ जणांवर उपचारापूर्वीच कोरोनाने झपड घातली. (1122 Patiend died befor treatment)

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची मृत्युसंख्या आता ८ हजार ३२५ एवढी झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील मृत्यूदर प्रचंड वाढला होता. कोरोना झाल्याचा संशयाने चाचण्या करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली. यामुळे कोरोना चाचणीचा अहवाल येण्यास उशीर होऊ लागला. यामुळे उपचारालाही उशीर होत असल्याने कोरोनाची दुसरी लाट पेलवू न शकल्याने खाटांसाठी धावाधाव सुरू झाली. मात्र उपचारासाठी मेयो, मेडिकलमध्ये दाखल करण्यापूर्वीच १ हजार १२२ कोरोनाबाधितांना जीव गमवावा लागला. मृतावस्थेताच मेडिकल-मेयोत त्यांना दाखल करण्यासाठी आणले. दुर्दैवाने रुग्णालयात येण्यापूर्वीच त्यांच्यावर कोरोनाने झडप घातली. त्यामुळे या बाधितांची ब्रॉड डेथ कोविड पॉझिटिव्ह अशी नोंद करण्यात आली. 

कोरोना विषाणूने जिल्ह्यात पाय ठेवल्यापासून आतापर्यंत ४ लाख ५६ हजारावर कोरोना बाधितांची नोंद घेतली गेली. त्यातील ४ लाख ४ हजारापेक्षा अधिक बाधित रुग्ण उपचाराने ठणठणीत बरे होऊन घरी परतले. मात्र जिल्ह्यात उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांपैकी १० हजार १८ कोरोनाबाधित बरे झाले आहेत. मात्र यांपैकी ८०५ कोरोनाबाधित मृत्यू पावले. तर मेयो रुग्णालयात कोरोनावरील उपचारासाठी दाखल झाल्यानंतर १०हजार ६५० कोरोनाबाधित ठणठणीत बरे झाले. मात्र यादरम्यान २ हजार ८८६ जीव कोरोनाने घेतले आहेत. मात्र कोरोनाचा संशय आल्यानंतर चाचणीला उशीर झाल्यामुळे किंवा घरीच उपचार करण्याची चूक भोवल्यामुळे कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी १ हजार १२२ कोरोनाबाधितांचे रुग्णालयात येण्यापूर्वीच वाटेतच मृत्यू झाले. यांना कोरोनावरील उपचार घेताच आले नाही. 

जिल्ह्याबाहेरच्या मृत्यूंनी वाढला नागपूरचा मृत्यूदर 
कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर विविध जिल्ह्यांतून मेयो, मेडिकल तसेच खासगी रुग्णालयात उपचारासाठी रेफर करण्यात आले. वर्षभरात सुमारे १ हजार ३८४ कोरोनाबाधितांना रेफर करण्यात आले. यांपैकी १ हजार २०२ जणांचा मृत्यू झाला. रेफर करण्यात आलेल्या रुग्णांच्या मृत्यूचा टक्का नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक आहे. यामुळेच नागपूर जिल्ह्यातील कोरोनाच्या मृत्यूचा टक्का वाढला असल्याचे दिसून येते. 

- मेयोच्या कोविड हॉस्पिटलमध्ये मृतावस्थेत (ब्रॉड डेथ)आलेले बाधित ः ४५५ 
- मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये मृतावस्थेत (ब्रॉड डेथ) आलेले बाधित ः ६६७
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com