'हा येणाऱ्या तरुण पिढ्यांचा, देशाच्या भविष्याचा प्रश्न'

अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोने शाहरुखचा मुलगा आर्यन खान याच्यासह मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट यांना वैद्यकीय तपासणी नंतर अटक केली.
Congress Leader Atul Londhe
Congress Leader Atul Londhe

नागपूर : ''मुंबईत ड्रग्ज (Drugs) सापडलं त्यात मुंबईतल्या अनेक मोठ्या लोकांची मुले पकडली. तरुण पिढी अशी ड्रग्जच्या आहारी जाणे हे देशासाठी चांगले नाही, पण एनसीबी जे लोक ड्रग्ज घेतात त्यांच्यावर कारवाई करते आणि ती करायलाही पाहिजे. पण अमली पदार्थ विरोधी कायद्याप्रमाणे ड्रग्ज घेणे हा गुन्हा नाही, जे ड्रग्ज चा पेडलिंग करतात म्हणजे ते आणणे आणि विकणे हा गुन्हा आहे, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे,'' असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी व्यक्त केले आहे.

Congress Leader Atul Londhe
अखेर एनसीबीकडून शाहरुख खानच्या मुलाला अटक

अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोने (NCB) शनिवारी रात्री एका लक्झरी क्रुझवर छापा टाकत १० जणांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान इतर 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौकशी अंती आज दुपारी एनसीबीने शाहरुखचा मुलगा आर्यन खान याच्यासह मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट यांना वैद्यकीय तपासणी नंतर अटक करण्यात आली. मात्र या सर्व घडामोडींवर अतुल लोंढे यांनी आपली भुमिका मांडली आहे.

" मुंबई ड्रग्ज पार्टीतील तरुणांवर कारवाई होत असेल तर, मुंब्रा पोर्ट मधून ३ हजार किलो ( २१ कोटी) ड्रग्ज येत असेल तर आपण त्यावर काय कारवाई करतो यावरही चर्चा व्हायला पाहिजे. ज्या लोकांनी हे ड्रग्ज आणले त्यांच काय झालं, त्यांच्याबाबत कोणतीही माहिती समोर येत नाही. त्यामुळे ज्या ज्या आंतरराष्ट्रीय सीमा आहेत ,तिथून जर ड्रग्ज येत असेल तर ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे. आणि केंद्राने ही जबाबदारी झटकता कामा नये. कारण हा पक्षीय प्रश्न नाही, हा समाजाचा प्रश्न आहे. येणाऱ्या पिढ्यांचा प्रश्न आहे, देशाच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे देशात ड्रग्ज आणणाऱ्यानाच आधी पकडले पाहिजे, ड्रग्ज देशात आलेच नाही पाहिजे, आणि मग देशात जनजागृती केली पाहिजे, तसेच देशात जे काही पेडलर आहेत त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे,तरच आपण हा रोग आटोक्यात आणू शकू, नाहीतर देशातील पिढी याला बळी पडल्याशिवाय राहणार नाही. अशी काळजीही यावेळी अतूल लोंढे यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com