लाॅकडाऊनमध्ये अखंडित वीजपुरवठ्यासाठी कोळसा काढणे सुरुच

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. या परिस्थितीतही कोळसा उत्पादन सुरू आहे. नागरिकांना अखंडित वीजपुरवठा व्हावा, यासाठी वीज केंद्रांना कोळशाची कमतरता भासू नये, म्हणून सातत्याने कोळसा पुरवठा सुरू आहे. वेकोलिने २०१९-२० या वर्षातील उत्पादनाचे लक्ष्य पूर्ण केले असून ३१ मार्च रोजी आतापर्यंतच्या सर्वाधिक कोळशाचे उत्खननही केले आहे.
coal production continues to provide uninterrupted power supply
coal production continues to provide uninterrupted power supply

नागपूर - कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. या परिस्थितीतही कोळसा उत्पादन सुरू आहे. नागरिकांना अखंडित वीजपुरवठा व्हावा, यासाठी वीज केंद्रांना कोळशाची कमतरता भासू नये, म्हणून सातत्याने कोळसा पुरवठा सुरू आहे. वेकोलिने २०१९-२० या वर्षातील उत्पादनाचे लक्ष्य पूर्ण केले असून ३१ मार्च रोजी आतापर्यंतच्या सर्वाधिक कोळशाचे उत्खननही केले आहे.

कंपनीने लॉकडाऊनच्याच काळात २७ मार्च रोजी वेकोलिच्या ४२,००० कर्मचाऱ्यांनी एका दिवसात आतापर्यंतचे सर्वाधिक ४.०२ लाख टन कोळशाचे उत्पादन केले होते. हा  रेकॉर्डसुद्धा ३१ मार्च रोजी तुटला आहे. या दिवशी ५.०२ लाख टन कोळशाचे उत्पादन करण्यात आले. यापूर्वी २७ मार्च रोजी वेकोलिने एका दिवशी सर्वाधिक ४.०२ लाख टन कोळशाचे उत्पादन केले होते. सोबतच वेकोलिने वर्ष २०१९-२० साठी ठरवलेले लक्ष्य ५६ मिलियन टनाऐवजी ५७.६४ मिलियन टन उत्पादन केले होते. लॉकडाऊनमध्ये वेकोलिने ८.४ टक्के वाढ नोंदवली आहे. आता कंपनीने वर्ष २०२०-२१ साठी वेकोलिला ६२ मिलियन टन कोळसा उत्पादनाचे लक्ष्य निश्चित केले आहे. व्यावसायिकदृष्ट्या वाळू उत्खननाची परवानगी मिळाल्यानंतर वेकोलि सरकारी संस्थांना स्वस्त दरावर वाळूसुद्धा देत आहे.

मास्कचे वाटप, रुग्णालयात विशेष खाटा
वेकोलि व्यवस्थापनातर्फे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. कर्मचाऱ्यांना २५,००० मास्क वाटण्यात आले आहेत. १० हजार आणखी उपलब्ध केले जाणार आहेत. १० हजार रुमाल किंवा स्कार्फसुद्धा देण्यात आले आहेत. प्रत्येक खाणीमध्ये हँडवॉश उपलब्ध करून दिलेे आहेत. दोन कर्मचाऱ्यांमध्ये अंतर ठेवले जात आहे. प्रत्येक मशीन, उपकरणांना सॅनिटाईझ केले जात आहे. दुसरीकडे कंपनीच्या दहा रुग्णालयांमध्ये कोरोना संशयित रुग्णांसाठी विशेष बेड तयार करण्यात आलेले आहेत. डॉक्टर्स, नर्स आणि मेडिकल स्टाफला अलर्ट ठेवण्यात आले आहे.

टास्क फोर्स गठित
खदानींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कायम आहे. परंतु मुख्यालय व इतर प्रशासकीय कार्यालयांमध्ये दहा टक्के कर्मचाऱ्यांवर काम चालवले जात आहे. यासोबतच कोरोनासंदर्भात टास्क फोर्स गठित करण्यात आला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com