उदय सामंतांसमोरच राडा..शिवसैनिकाने संपर्क प्रमुखाच्या कानाखाली लगावली - clashes in shivsena workers in front of minister uday samant | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

उदय सामंतांसमोरच राडा..शिवसैनिकाने संपर्क प्रमुखाच्या कानाखाली लगावली

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 जुलै 2021

शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी वर्ध्यात आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत शिवसैनिकांत जोरदार राडा झाला. 

वर्धा : शिवसेनेचे (Shivsena) नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी वर्ध्यात आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत शिवसैनिकांत जोरदार राडा झाला. शिवसेना संपर्क प्रमुखाच्या कानशिलात लगावल्याचा दावा एका गटाकडून केला जात आहे. तर दुसर्‍या गटाने संपर्क प्रमुखांसोबत काहीही घडले नसल्याचे म्हटले आहे.

सामंत यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्याने मास्क लावला नसल्यावरुन हा वाद सुरू झाला. मास्क न घातल्याबद्दल त्याला हटकल्यावरून भांडण सुरू झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आज वर्ध्यात आले होते. विश्रामगृहात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सामंत यांची भेट घेतली. 

या वेळी हिंगणघाट येथील सीताराम भुते सामंत यांना निवेदन देण्यासाठी आले. तेव्हा त्यांनी मास्क न लावलेला नसल्याने त्यांना मास्क लावण्यासाठी संपर्क प्रमुख अनंत गुढे यांनी सांगितले. यानंतर वादाला सुरुवात झाली. त्यावरून दोन गटांत चांगलीच जुंपली आणि शिवीगाळही सुरू झाली. या वेळी सीताराम भुते यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे यांना कानशिलात लागावल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा : आपण एकाच कॉलेजचे, असं म्हणत रेल्वेमंत्र्यांनी इंजिनिअरची घेतली गळाभेट 

याबद्दल जिल्हाप्रमुख प्रशांत शहागडकर म्हणाले की, सीताराम भुते यांनी मास्क लावला नसल्याने त्यांना हटकले असता बाचाबाची झाली. संपर्क प्रमुखांना काहीही झाले नाही. तेव्हा मी तेथे उपस्थित होतो. हा संपर्क प्रमुखांना बदनाम करण्याचा कट आहे.

याविषयी बोलताना सीताराम भुते म्हणाले की, उदय सामंत वर्ध्यात आले असता त्यांना विधानसभा क्षेत्रातील समस्यांबाबत निवेदन देण्यासाठी आलो होतो. त्यावेळी संपर्क प्रमुखांनी वरच्या सुरात संवाद साधला. त्यामुळे बाचाबाची झाली. यात संपर्क प्रमुखाला दोन कानशिलात लगावल्या. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख