राज्यातील दहा सर्वोत्कृष्ट आमदारांत समीर मेघे : बावनकुळे

समीर समाजकारण व राजकारणाचे बाळकडू घेतलेले उमेदवार आहेत. वडिलांचा वारसा घेऊन ते समाजसेवेत उतरलेले आहेत, असे वर्षा उसगावकर यांनी सांगितले.
राज्यातील दहा सर्वोत्कृष्ट आमदारांत समीर मेघे : बावनकुळे

नागपूर : राज्यातील 10 उत्कृष्ट आमदारांमध्ये समीर मेघे यांचा समावेश आहे. मतदारसंघातील सर्वच गावांचा विकास करू पाहणारे ते नेते आहेत. मेघेंच्या रूपाने पुन्हा तुम्हाला एक उत्कृष्ट आमदार लाभणार आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोखारा येथील प्रचारसभेत केले.

निवडणूक प्रचार सभा व मतदारसंघातील गावांना भेटी देताना समीर मेघे यांनी खडकी, लखमापूर, किन्ही, भान्सोली, गांधी खापरी, देवळी (निस्ताने), पिपरी, गोंडवानानगर येथे नागरिकांशी चर्चा केली. यावेळी मतदारसंघातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून त्यांच्यासमोर अनेक विषय मांडले. मेघे यांच्या प्रचारार्थ बुटीबोरी येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेला सिनेअभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी संबोधित केले. 

आकाश वानखेडे म्हणाले, समीर मेघे आमदारापेक्षा मित्र अधिक, वैयक्‍तिक मदत करणारे समाजशील व्यक्ती, शेतकरी, गरीब कुटुंबीय, कामगार अशा प्रत्येकाच्या कल्याणासाठी झटणारे आहेत. सभेत उपस्थित बुटीबोरीच्या स्थानिकांनी शहरास नगरपरिषदेचा दर्जा व वर्षभरात विकासकामांसाठी 11 कोटींचा निधी मिळवून दिल्यानेच विकासाची गती वेगवान झाली आहे. बुटीबोरी एमआयडीसीमधील कारखांन्यामधील कामगारांना राज्य सरकारने किमान वेतन वाढीच्या निर्णयाने दिलेला लाभ उल्लेखनीय आहे, असे मत व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com