भाजपच्या ‘या’ नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच साथीदारांसह झाला फरार...

गुंड मुन्ना यादव हा कुणाचा कार्यकर्ता आहे, हे एकदा तपासले पाहिजे, असे गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते. त्यामुळे मुन्ना भाजपमधील कोणत्या नेत्याचा कार्यकर्ता आहे, याचा शोध राजकीय मंडळी घेत असल्याचेही सांगण्यात येते.
Munna Yadav - Panju Totwani
Munna Yadav - Panju Totwani

नागपूर : एका महिलेचा भूखंड दुसऱ्याच्याच नावावर केल्यानंतर त्या महिलेने ओरड करू नये म्हणून तिला धमकावणे भारतीय जनता पक्षाचा नेता व संघटित बांधकाम कामगार कल्याण महामंडळाचा माजी अध्यक्ष मुन्ना यादव याच्या चांगलेच अंगलट आले. एमआयडीसी पोलिसांनी यादव व त्याच्या साथीदारावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. यानंतर यादव कथित सामाजिक कार्यकर्ता पंजू किसनचंद तोतवानी व इतर तीन आरोपी फरार झाले आहेत. फरार आरोपींचा एमआयडीसी पोलिस कसून शोध घेत आहेत. 

गुंड मुन्ना यादव हा कुणाचा कार्यकर्ता आहे, हे एकदा तपासले पाहिजे, असे गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते. त्यामुळे मुन्ना भाजपमधील कोणत्या नेत्याचा कार्यकर्ता आहे, याचा शोध राजकीय मंडळी घेत असल्याचेही सांगण्यात येते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेने आरोपींवर दाखल असलेले आजवरचे गुन्हे आणि त्यांची संघटित गुन्हेगारी लक्षात घेता मोक्काचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सदर पीडित महिला ही अनुसूचित जाती प्रवर्गात मोडते. आरोपींनी तिच्या ताब्यातील भूखंड बळकावण्यासाठी अश्लील शिवीगाळ करून दबाव टाकला आणि तिला धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मुन्ना यादव, पंजू तोतवानीसह अन्य आरोपींविरुद्ध अ‍ॅट्रोसिटीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. त्यामुळे पोलिसांकडून कारवाईचा आवळत जाणारा फास बघता आरोपी मुन्ना यादव, पंजू तोतवानी याच्यासह पाचही आरोपी फरार झाले आहेत. 

राजवीर यादव, गणेश यादव, प्रॉपर्टी डिलर प्रमोद डोंगरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अन्य आरोपींची नावे आहेत.  तक्रारदार ४० वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या नूतन रेवतकर आणि मनपातील माजी सत्तापक्ष नेता वेदप्रकाश आर्य यांनी सुद्धा मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे.
 
व्हॉट्सअपवरुन दिल्या धमक्या 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद डोंगरे हा प्रॉपर्टी डिलर आहे. पीडित महिलेने प्रमोद यांच्यासोबत पांडुरंगनगर येथील भूखंड १२ लाखांमध्ये खरेदीचा व्यवहार केला. प्रमोदने महिलेऐवजी भूखंडाचे विक्रीपत्र मुन्ना यादवचा पंटर राजवीर यादव याला करून दिले. मुन्ना यादव याने पंजू तोतवानीला त्या महिलेला धडा शिकविण्यास सांगितले. पंजू तोतवानीने व्हॉट्सअपवरुन तक्रार परत घेण्यासाठी दबाव टाकल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com