महिलांना अटक करता, ज्याने १० हजार जमवले त्याचे काय केले ?

वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीत सर्व नियम धाब्यावर बसवून आणि मुख्यमंत्र्यांचा आदेश झुगारून १० हजारांपेक्षा जास्त लोकांची गर्दी जमवली. त्यातून अनेकांना कोरोनाची बाधा झाली. अजूनही गर्दीतील लोकांच्या मानगुटीवरून कोरोनाचे भूत उतरलेले नाही.
Maya Shere on Sanjay Rathore
Maya Shere on Sanjay Rathore

यवतमाळ : पूजा चव्हाणच्या मृत्यूला जबाबदार असलेले वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, त्यांचा राजीनामा घ्या, या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या सदस्यांना पोलिसांनी अटक केली. कोरोनाच्या सर्व नियमांत राहून आंदोलन करणाऱ्या महिलांना तुम्ही अटक करता. मग ज्याने १० हजारांपेक्षा जास्त लोकांची गर्दी जमवली, त्याचे काय केले, असा संतप्त सवाल भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माया शेरे यांनी आज पोलिसांना विचारला. 

पूजा चव्हाणच्या मृत्यूला वनमंत्री संजय राठोड जबाबदार आहे, असा आरोप करीत भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज स्थानिक बसस्थानक चौकात रास्तारोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी नियोजनबद्ध बंदोबस्त तैनात केल्याने हे आंदोलन उधळले गेले. मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हाती फलक घेऊन भाजप महिला कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली. संजय राठोड यांच्या आवाजातील 12 ऑडिओ क्लिप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिल्यानंतर देखील पोलिसांकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने पूजाला न्याय द्या, अशी मागणी भाजप महिला आघाडीची होती. वनमंत्री संजय राठोड विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशा मागणी आंदोलक महिलांची होती. 

गुन्हा दाखल होत नसल्याने पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले. आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने पोलिसांनी आंदोलनस्थळी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. परिणामी भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची आंदोलन करण्यावरून पोलिसांशी बाचाबाची झाली. भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष माया शेरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनानंतर शेरे यांच्यासह आंदोलनात उपस्थित सात महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर, पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा याठिकाणी तैनात होता. 

आंदोलनासाठी जमलेल्या महिलांना आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे महिलांची पोलिसांसोबत चांगलीच बाचाबाची झाली. वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीत सर्व नियम धाब्यावर बसवून आणि मुख्यमंत्र्यांचा आदेश झुगारून १० हजारांपेक्षा जास्त लोकांची गर्दी जमवली. त्यातून अनेकांना कोरोनाची बाधा झाली. अजूनही गर्दीतील लोकांच्या मानगुटीवरून कोरोनाचे भूत उतरलेले नाही. पण त्यांच्यावर कारवाई न करू शकलेले तुम्ही पोलिस आम्हा महिलांना का म्हणून ताब्यात घेत आहात, असा संतप्त सवाल माया शेरे यांनी पोलिसांना केला. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com