करपेंच्या ‘टायगर जिंदा है’ला सिंहाने दिले हे उत्तर...

करपेंनी वाढदिवसाच्या माध्यमातून तयार केलेल्या राजकीय वातावरणानंतर चंदेल कसे चूप राहतील? राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, राजेश कवठे व जिल्ह्यातील अनेक नेत्यांना सोबत घेत चंदेल यांनी मुंबई गाठली.
करपेंच्या ‘टायगर जिंदा है’ला सिंहाने दिले हे उत्तर...
Sarkarnama

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : ‘टायगर जिंदा है’ Tiger zindha hai म्हणत संदीप करपे Sandip Karpe यांनी सहा वर्षानंतर सक्रिय राजकारणात एन्ट्री मारली अन् शिवसेनेत प्रवेश करून उपजिल्हाप्रमुख पद मिळविले. वाढदिवसाचे औचित्य साधून राजकीय वातावरण निर्माण केले. आता टायगर जिंदा झाल्यानंतर सिंह तरी चूप कसा राहणार. महेंद्र‘सिह’ चंदेल Mahendrasingh Chandel यांनीही सिंहाचे रूप घेऊन मुंबई गाठली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील State President of NCP Jayant Patil यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला अन् जिल्हा उपाध्यक्षपदी विराजमान झाले. येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकांसाठी होत असलेला हा सारा प्रकार सध्या तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील राजकारण तसे करपे, चंदेल यांच्याभोवतीच फिरत आले आहे. दरम्यानच्या काळात दारूबंदी झाली. अन् त्यांच्या राजकीय सक्रियतेला बराचसा ब्रेक लागला. दारूबंदी उठल्यानंतर अनेकांच्या उत्साहात मोठा भर पडला आहे. तब्बल तिनदा जिल्हा परिषद सदस्यपद भूषविलेल्या व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद सांभाळलेल्या संदीप करपे यांचे सुधीर मुनगंटीवार यांच्याशी मतभेद झाले. अन् त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर अगदी काहीच दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जुने कार्यकर्ते जवळ आणले.

आपल्या वाढदिवशी शक्तिप्रदर्शन करून तालुक्यात भाजपचे पानिपत करण्याचा इशारा दिला. करपे अनेक दिवस सक्रिय राजकारणापासून दूर होते. आता त्यांच्या एन्ट्रीनंतर स्वतः करपे व कार्यकर्ते ‘टायगर अभी जिंदा है’ असे सांगू लागले आहेत. करपे यांच्या दुकानासमोर मागे वाघ व समोर करपे यांचा मोठा फोटो असलेला बॅनर कायमस्वरूपी लागला आहे. करपेंच्या ‘टायगर अभी जिंदा है’ हा विषय समाजमाध्यमवंवरही बराच गाजला. त्यावरून बरीच टिकाटिपणीही झाली.

करपेंनी वाढदिवसाच्या माध्यमातून तयार केलेल्या राजकीय वातावरणानंतर चंदेल कसे चूप राहतील? राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, राजेश कवठे व जिल्ह्यातील अनेक नेत्यांना सोबत घेत चंदेल यांनी मुंबई गाठली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. अन् थेट उपजिल्हाध्यक्षपद मिळविले. इकडे गावात त्यांची एन्ट्री झाली अन् फटाके फोडून जल्लोषात स्वागत करीत वातावरण निर्मिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली.

गोंडपिपरी नगरपंचायतीवर आपलीच सत्ता असावी, यासाठी नेत्यांकडून आत्तापासून नियोजन सुरू झाले आहे. करपे, चंदेल यात आघाडीवर आहेत. गेल्या सहा वर्षांपासून राजकारणापासून जरा दुरच असणाऱ्या या नेत्यांमध्ये दारूबंदी उठल्यानंतर निर्माण झालेली सक्रियता चांगलीच चर्चिली जात आहे आणि दारूबंदी उठल्यानंतरच हे नेते का सक्रिय झाले, याचे उत्तर शोधले जात आहे. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in