देशमुखांच्या घरांची झाडाझडती सुरुच; काय सापडले, त्याचे रहस्य कायम...

शुक्रवारी सकाळी प्राप्तिकर विभागाची चमू (Income Tax Department's Team) देशमुख (Anil Deshmukh) यांच्या मुंबई, नागपूर, काटोलचे घर तसेच रामदास पेठ येथील एनआयटी कॉलेजच्या कार्यालयात धडकली होती.

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सिव्हील लाईन आणि काटोल येथील घरामध्ये प्राप्तिकर विभागाची झाडाझडती शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ४८ तास उलटून गेल्यानंतरही तपासणी सुरू असल्याने प्राप्तिकर विभागाच्या हाती नेमके काय लागले याचे रहस्य वाढले आहे.

शुक्रवारी सकाळी प्राप्तिकर विभागाची चमू देशमुख यांच्या मुंबई, नागपूर, काटोलचे घर तसेच रामदास पेठ येथील एनआयटी कॉलेजच्या कार्यालयात धडकली होती. सोबतच मुंबईतसुद्धा छापे टाकण्यात आल्याचे समजते. प्राप्तिकर विभागाच्या चमूमध्ये सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांचा समावेश होता. प्राप्त झालेल्या माहितीनुसार शनिवारीसुद्धा देशमुखांच्या नागपूर आणि काटोलमधील घरांची झाडाझडती रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

देशमुखांच्या घरांची झाडाझडती सुरुच; काय सापडले, त्याचे रहस्य कायम...
अनिल देशमुख कुठे आहेत, हे राष्ट्रवादीनं सांगावे !

इतर प्रतिष्ठानांवर पडताळणी पूर्ण झाल्याने तेथून प्राप्तिकर विभागाचे पथक निघून गेले. त्यांच्या हाती नेमके काय लागले हे अद्याप समजू शकले नाही. मात्र तब्बल अठ्‍ठेचाळीस तासांपासून कारवाई सुरू असल्याने देशमुखांच्या आर्थिक व्यवहाराची अतिशय बारकाईने पडताळणी करून त्याची नोंद अधिकाऱ्यांमार्फत घेतली जात असल्याचे दिसून येते.

गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी मुंबईच्या बारमधून शंभर कोटी रुपये वसूल करून देण्याचे आदेश दिले होते. असा आरोप तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी केला होता. त्यामुळे देशमुखांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ईडीने देशमुखांच्या घरावर धाडी टाकल्या. नागपूरमध्ये तीन वेळा ईडीचे पथक येऊन गेले. देशमुख यांच्याशी संबंधित व्यावसायिक आणि कंत्राटदारांच्या प्रतिष्ठानांवरसुद्धा छापे टाकण्यात आले होते. ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी त्यांना आत्तापर्यंत त्यांना सातवेळा नोटीस बजावली. मात्र देशमुखांनी या विरोधात न्यायालयामध्ये धाव घेतली.

वकिलांमार्फत युक्तिवाद केला. मात्र न्यायालयात त्यांना दिलासा मिळाला नाही. उलट देशमुख संचालक असलेल्या श्री साई शिक्षण संस्थेत हवालामार्फत चार कोटी जमा झाल्याचे या दरम्यान उघडकीस आले. त्यामुळे देशमुखांच्या मागे सीबीआयनेसुद्धा ससेमिरा लावला आहे. त्यांच्या दोन स्वियसहायकांना अटकसुद्धा केली आहे. तसेच सीबीआयची माहिती लिक केल्याने त्यांच्या वकिलांवरसुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात आता प्राप्तिकर विभागाने छापे टाकल्याने देशमुखांच्या अडचणी आणखी वाढल्याचे बोलल्या जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com