...अन् खासदार - आमदार एकमेकांवर धावून जायला उठले !

आमदार राजेंद्र पाटणी यांना विचारले असता, ते म्हणाले की, मी कुठलाच वाद घातला नाही. तर खासदार भावना गवळींनी ‘नंतर बोलेल’ अस सांगून बोलण्याचे टाळले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भाजप सेनेचे कार्यकर्ते जमा झाल्याने वाद उद्भवणार, हे लक्षात येताच पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली होती.
Bhawana Gawali and Rajendra Patni
Bhawana Gawali and Rajendra Patni

वाशीम : शिवसेनेच्या यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी आणि कारंजाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यातील राजकीय वैर तसे जुनेच. वादावादीपर्यंत ठीक होते, पण काल त्यांच्यातील शाब्दिक वाद इतका विकोपाला गेला की, दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून जायला उठले. खासदार गवळींनी मागे यवतमाळात आंदोलन केले होते, तेव्हाही कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याला मारहाण केली होती. त्यानंतर भाजप-सेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. 

वाशीमच्या जिल्हा नियोजन भवनात काल जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सगळे लोकप्रतिनिधी जिल्ह्याच्या आढावा बैठकीत उपस्थित राहणार होते. त्यापूर्वी विकास कामात अडथळा निर्माण करून शिवसेनेने आणलेल्या विकास कामाला बाधा निर्माण का करता, असे म्हणत खासदार भावना आणि आमदार पाटणी आमने-सामने आले आणि तू तू, मै मै सुरू झाली. या दरम्यान शिवीगाळही झाली. तर शिवसेनेचे कार्यकर्ते आमदार पाटणी यांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर तिथे उपस्थित पोलिसांच्या मध्यस्थीने वाद निवळला. यानंतर आमदार राजेंद्र पाटणी यांनी वाशीम पोलीस ठाण्यात खासदार भावना गवळी यांनी धमकी दिल्याची तक्रार दाखल केली.

  
घडलेल्या प्रकाराबाबत आमदार राजेंद्र पाटणी यांना विचारले असता, ते म्हणाले की, मी कुठलाच वाद घातला नाही. तर खासदार भावना गवळींनी ‘नंतर बोलेल’ अस सांगून बोलण्याचे टाळले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भाजप सेनेचे कार्यकर्ते जमा झाल्याने वाद उद्भवणार, हे लक्षात येताच पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली होती. या प्रकारानंतर भाजपच्यावतीने शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते, या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com