अशोक चव्हाणांच्या फोननंतर नितीन गडकरींनी दिला टॅंकरवाल्याला दम....

आपल्याकडे रक्ताचा आणि प्लाझ्माचा मोठा तुटवडा आहे. कोरोनाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी प्लाझ्माची गरच आहे. सर्व ब्लड बॅंकांसाठी लोकांनी रक्तदान करणे गरजेचे आहे. डॉ. हेडगेवार रक्तपेढीमध्ये दोन मशीन होत्या, १०-१२ लोक वेटींगवर राहायचे. त्यांना ४० लाख रुपयांच्या आणखी दोन मशीन्स मिळवून दिल्या आहेत.
Nitin Gadkari - Ashok Chavan
Nitin Gadkari - Ashok Chavan

नागपूर : औषधे आणि इंजेक्शनच्या (Drugs and Injections) काळ्या बाजारानंतर आता ॲम्ब्यूलन्स आणि टॅंकरचाही काळा बाजार (Black Marketing) सुरू झाला आहे. ‘राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा फोन आता होता. ते म्हणत होते की, विशाखापट्टणनम वरून आलेल्या टॅकरवाल्याने टॅंकर पळवून नेला आणि १५ लाख रुपये मागत होता. त्यानंतर मी रात्री १२ वाजतानंतर टॅंकरवाल्याला फोन करून दम दिला. तेव्हा कुठे नांदेडला टॅंकर मिळाला. कोविडच्या अशा काळात कुणी गरीब लोकांना ब्लॅकमेल करू नये. कारण ही चौकशी करणे, कारवाई करणे, डॉक्टरांच्या चुका शोधणे, याची ही वेळ नाही’, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले. 

माझे सहकारी अविनाश घुसेंनी सांगितले. की, त्यांच्या आईला धंतोलीमधून अजनीला एका हॉस्पिटलमध्ये नेले. ॲम्ब्यूलन्सवाल्याने त्यासाठी १७ हजार रुपये घेतले. केंद्रीय वाहतूक मंत्री म्हणून मी सचिवांशी बोललो आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ॲम्ब्यूलन्सला मीटर बसवून त्यांचे दर नक्की कसे करता येईल, यावरही विचार सुरू असल्याचे ते म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित (ऑनलाइन) करताना गडकरी बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, शहराध्यक्ष व आमदार प्रवीण दटके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ऑक्सिजनच्या प्रत्येक टॅंकरमध्ये एक पोलिस बसविण्यात येत आहे. त्यामुळे आता टॅंकर चोरीसारखे प्रकार होणार नाहीत. ऑक्सिजनची टंचाई कमी करण्यासाठी चार टॅंकर भुवनेश्‍वरला विमानातून पाठवले. कालच प्रत्येकी ३४ टनांचे दोन क्रायोजेनिक टॅंकर प्यारे खान यांनी सिंगापूर येथून विकत मिळवून दिले. हा करार आज पूर्ण होणार आहे. यामुळे आता एकाच कंटेनरमध्ये ६८ टन ऑक्सिजन मिळणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. 

एम्ससह मेयो आणि मेडिकललासुद्धा स्वयंपूर्ण करण्याचे काम सुरू आहे. पुढील लाट येण्यापूर्वी या सर्व व्यवस्था पूर्ण होतील, असे प्रयत्न आहेत. कोळसामंत्री प्रल्हाद जोशींना विनंती केली होती. त्यानंतर डब्यूसीएलने १५ कोटी रुपये दिले. ३.५ कोटी रुपये चंद्रपूर येथे ४०० बेडचा मोठा प्लांट तयार करण्यासाठी डब्लूसीएलने जिल्हाधिकारी गुल्हाने यांना दिले. ११.५ ते १२ कोटी रुपये नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मेयो, मेडिकल आणि एम्स या रुग्णालयांना हवेतून ऑक्सिजन मिळाला, तर आपल्याला मोठा दिलासा मिळणार आहे. वर्धा, सेवाग्राम आणि मेघेंच्या हॉस्पिटलने २० टनांच्या टॅंक घेतल्या आहेत. कन्हेरे आणि छोटू बोरीकरांसारखे २५ -३० कार्यकर्ते तयार झाले तर लोकांचे प्राण वाजवण्याचे मोठे काम होऊ शकते. त्यांनी एखादे वर्कशॉप घेऊन ते करावे, अशी अपेक्षा गडकरींनी व्यक्त केली. 

आपल्याकडे रक्ताचा आणि प्लाझ्माचा मोठा तुटवडा आहे. कोरोनाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी प्लाझ्माची गरच आहे. सर्व ब्लड बॅंकांसाठी लोकांनी रक्तदान करणे गरजेचे आहे. डॉ. हेडगेवार रक्तपेढीमध्ये दोन मशीन होत्या, १०-१२ लोक वेटींगवर राहायचे. त्यांना ४० लाख रुपयांच्या आणखी दोन मशीन्स मिळवून दिल्या आहेत. त्यामुळे तेथे दुप्पट वेगाने काम होणार आहे. महत्वाचे म्हणजे रक्तदान शिबिरेसुद्धा या काळात घेऊ नये. कारण त्यामध्ये कोरोना संक्रमणाचा धोका अधिक आहे. त्यापेक्षा प्रत्येक वार्डातून नावे ठरवून आणि वेळा नक्की करून रक्तदान आणि प्लाझ्मा दान करावे. 

प्रभागनिहाय उपलब्ध करावी शववाहिका आणि ॲम्ब्यूलन्स
प्रत्येक प्रभागासाठी एक शववाहिका आणि ॲम्ब्यूलन्स उपलब्ध करण्याची आज गरज आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यासाठी १२ ते १५ ॲम्ब्यूलन्स याप्रमाणे एकूण १२५ ते १५० अत्याधुनिक ॲम्ब्यूलन्सची व्यवस्था करावी लागणार असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.
 Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com