नागपूर जिल्हा परीषदेत उपाध्यक्षांना खाते मिळालेच नाही

विषय समिती वाटपाचे अधिकार अध्यक्षांना देण्यात आले आहेत. समित्यांवरून पक्षात कोणताही मतभेद वा नाराजी नाही. सामंजस्याने निर्णय घेण्यात येईल. दोन, तीन दिवसांत सभापतींच्या विषय समित्या वाटपाचा निर्णय घेण्यात येईल. - रश्‍मी बर्वे, अध्यक्ष, जिल्हा परिषद नागपूर
nagpur zp vice president didnt get portfolio 
nagpur zp vice president didnt get portfolio 

नागपूर : विषय समित्यांवरून कॉंग्रेसमध्ये एकमत होत नसल्याने अध्यक्षांकडे अधिकार देऊन आज झालेल्या विशेष सभेत वेळ मारून नेण्यात आली. त्यामुळे सुमारे महिना उलटून गेला असला तरी सभापतींना खाते मिळू शकले नाही. उपाध्यक्षांनाही खाते वाटप झाले नसल्याने उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

खातेवाटप करण्यासाठी सोमवारी जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलावण्यात आली होती. अर्थ व शिक्षण समितीसाठी कॉंग्रेसचे दोन सभापती आग्रही आहेत. जिल्हा परिषदेत कृषी व पशुसंवर्धन, शिक्षण, वित्त, बांधकाम, आरोग या विषय समित्या आहेत. तीन सभापतींना यांचे वाटप करायचे आहे. 30 जानेवारीला सभापतींची निवड झाली. 

मागील वेळच्या शिक्षण व अर्थ समिती सभापतीच्या कक्षात भारती पाटील व कृषी व पशुसंवर्धन सभापतीच्या कक्षात तापेश्‍वर वैद्य यांनी बसण्यास सुरुवात केली. पदभार स्वीकारताना हे चित्र उलट होते. दोन्ही सभपतींना शिक्षण व अर्थ समिती हवी आहे. पण अधिकृत निवड ही विशेष सभेत होईल, असे सांगण्यात येत होते. आज विशेष सभा पार पडली. यात समितीवर सदस्यांची निवडही झाली. सभापतींना विषय समित्यांचे वाटप करण्यात आले नाही. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, सभापती तापेश्‍वर वैद्य, भारती पाटील यांच्याकडेच ही जबाबदारी येणार आहे. हे तिघेही कॉंग्रेसचे सदस्य असून, कॉंग्रेसमधील अंतर्गत गुंता सुटताना दिसत नसल्याचे चित्र आहे.

आजच्या विशेष सभेत पहिलाच विषय सभापतींच्या निवडीचा होता. मात्र कॉंग्रेसच्या श्रेष्ठींना समित्याच निश्‍चित करता आल्या नाहीत. ते निश्‍चित करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची चांगलीच गोची झाली. शिवाय वेळही खर्ची झाला घातला. परंतु, निर्णय झाला नाही. त्यामुळे नाना कंभाले यांनी हा अधिकार अध्यक्षांना द्यावा, असा प्रस्ताव ठेवला. त्याचे कॉंग्रेसच्या काही सदस्यांनी समर्थन केले. राष्ट्रवादीचे गटनेते चंद्रशेखर कोल्हे यांनी ही बाब नियमात बसते का, असा सवाल करून याला अप्रत्यक्षरित्या विरोध दर्शविला. भाजपने शांत बसून अप्रत्यक्षरित्या त्याचे समर्थन केले. उप मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमिला जाखळेकर यांनी हे नियमात बसत असल्याचे स्पष्ट केल्याने विषयाला विराम मिळाला.

विषय समिती वाटपाचे अधिकार अध्यक्षांना देण्यात आले आहेत. समित्यांवरून पक्षात कोणताही मतभेद वा नाराजी नाही. सामंजस्याने निर्णय घेण्यात येईल. दोन, तीन दिवसांत सभापतींच्या विषय समित्या वाटपाचा निर्णय घेण्यात येईल.
- रश्‍मी बर्वे, अध्यक्ष, जिल्हा परिषद नागपूर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com