मंजूरी रेल्वेची, गेले विमानाने, नागपूर जिल्हा परीषदेचा केरळ दौऱ्याने अधिकारी अडचणीत?

जिल्हा परीषदेचा कर्नाटक, सिंधुदुर्ग दौरा मागे पडला असून जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांच्यासह 15 महिला सदस्य केरळ दौऱ्यावर गेल्या आहेत. या दौऱ्यासाठी रेल्वेचा प्रवास मंजूर असताना सर्वजण विमानाने गेल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील सूत्रांनी दिली. त्यामुळे या दौऱ्यात अधिकारी अडचणीत येणार असल्याची चर्चा रंगली आहे.
मंजूरी रेल्वेची, गेले विमानाने, नागपूर जिल्हा परीषदेचा केरळ दौऱ्याने अधिकारी अडचणीत?

नागपूर : जिल्हा परीषदेचा कर्नाटक, सिंधुदुर्ग दौरा मागे पडला असून जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांच्यासह 15 महिला सदस्य केरळ दौऱ्यावर गेल्या आहेत. या दौऱ्यासाठी रेल्वेचा प्रवास मंजूर असताना सर्वजण विमानाने गेल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील सूत्रांनी दिली. त्यामुळे या दौऱ्यात अधिकारी अडचणीत येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

रविवारी रात्री अध्यक्ष सावरकर आणि 15 महिला सदस्य जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या अभ्यास दौऱ्यावर निघाल्या. केरळ येथील उन्नी येथे हा सात दिवसीय दौरा आयोजित करण्यात आला आहे. देशासह राज्यातील इतर जिल्हा परिषदांनी केलेली कामे आपल्या जिल्ह्यात राबविता येईल का? याची पाहणी करण्यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अभ्यास दौरे काढण्यात येतात. मात्र, या अभ्यासदौऱ्याची प्रतिपूर्ती म्हणजेच त्यातून काय आत्मसात केले, याची प्रचिती कधीच नागपूर जिल्ह्यात तरी पहायला मिळीली नाही. यंदा पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन आणि महिला व बाल कल्याण विभाग यांच्या दोन वेगवेगळ्या स्वतंत्र अभ्यास दौऱ्यांचे नियोजन करण्यात आले.

पाणी टंचाईच्या परिस्थितीत हा दौरा निघत असल्याने प्रसार माध्यम आणि जिल्हा परिषदेतील काही आजी आणि माजी पदाधिकारी तसेच ज्येष्ठ सदस्यांकडून या दौऱ्यावर टीकेची झोड उठली. त्यामुळे हे दोन्ही दौरे थंड्या बस्त्यात गेले. आता केरळ दौरा काढण्यात आला आहे. सरकारी नियमांनुसार जिल्हा परिषदेच्या केवळ पदाधिकाऱ्यांनाच दौऱ्यासाठी विमानाने प्रवास करण्याची परवानगी असते. सदस्यांना रेल्वेच्या ए.सी. क्‍लास 2 पर्यंतच्या तिकिटाचीच परवानगी असते. मात्र दौऱ्यातील सर्वच सदस्य नागपूर येथून हैद्राबादला पोहोचले. त्यानंतर सर्व सदस्य हैद्राबाद येथून विमानाने केरळला गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांमार्फत प्राप्त झाली आहे.

जिल्हा परिषदेत 33 महिला सदस्य आहेत. या दौऱ्यावर 15 महिला सदस्यांनाच नेण्यात आले आहे. यात अध्यक्षांच्या मर्जीतील सदस्यांना प्राधान्य देण्यात आले. सोबतच त्यांना विरोध करणाऱ्या सदस्यांना नेऊन खूश करण्याचा प्रयत्न या दौऱ्याच्या निमीत्ताने करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com