Nagpur ZP | Sarkarnama

नागपूर जिल्हा परिषदेला मुदतवाढ 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 31 मार्च 2017

नागपूर :  नागपूर जिल्हा परिषदेला राज्य सरकारने मुदतवाढ दिल्याने जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या लालदिव्याच्या गाड्या कायम राहिल्या आहेत. जिल्हा परिषदेसोबतच जिल्ह्यातील सर्व 13 पंचायत समित्यांना मुदतवाढ मिळाली आहे. 

नागपूर :  नागपूर जिल्हा परिषदेला राज्य सरकारने मुदतवाढ दिल्याने जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या लालदिव्याच्या गाड्या कायम राहिल्या आहेत. जिल्हा परिषदेसोबतच जिल्ह्यातील सर्व 13 पंचायत समित्यांना मुदतवाढ मिळाली आहे. 

नागपूर जिल्हा परिषदेची मुदत 20 मार्चला संपली. त्यापूर्वी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड होणे आवश्‍यक होते. परंतु नागपूर जिल्ह्यातील काही गावांना नगरपरिषद व नगरपंचायतींचा दर्जा मिळाल्याने सर्कलची पुनर्रचना केली जाणार आहे. या पुनर्रचनेबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली नाही. सर्कलच्या पुनर्रचनेचे काम सुरू आहे. यावर अद्याप हरकतीही मागविलेल्या नाही. सर्कलची पुनर्रचना होण्यासाठी आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच निवडणुका शक्‍य होणार आहे. 

जुलै-ऑगस्ट महिन्यात पावसाची शक्‍यता तसेच शेतीची कामे राहत असल्याने या दोन महिन्यात ग्रामीण भागात निवडणुका घेणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे सप्टेंबर किंवा ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. राज्य सरकारने 30 मार्चला जारी केलेल्या अध्यादेशामध्ये जि. प.ला मुदतवाढ निवडणुकीपर्यंत दिल्याने जि. प. अध्यक्षांच्या गाडीवर किमान सहा महिने तरी लाल दिवा कायम राहणार आहे. निवडणुकीपर्यंत अध्यक्षपद कायम राहावे, यासाठी अध्यक्ष निशा सावरकर यांनी प्रयत्न केले होते. या प्रयत्नांना यश आले आहे.  

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख