`मुख्यमंत्र्यांना एक ग्लास पाणी भेट'

महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप करीत युवक कॉंग्रेसने मंगळवारी वाढदिवसानिमित्त "मुख्यमंत्र्यांना एक ग्लास पाणी भेट' असे बॅनर झळकावून आंदोलन केले. पाणीटंचाई असताना गळतीमुळे हजारो लिटर पाणी व्यर्थ जात असल्याचा आरोप नगरसेवक व युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके यांनी केला.
`मुख्यमंत्र्यांना एक ग्लास पाणी भेट'

नागपूर : महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप करीत युवक कॉंग्रेसने मंगळवारी वाढदिवसानिमित्त "मुख्यमंत्र्यांना एक ग्लास पाणी भेट' असे बॅनर झळकावून आंदोलन केले. पाणीटंचाई असताना गळतीमुळे हजारो लिटर पाणी व्यर्थ जात असल्याचा आरोप नगरसेवक व युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके यांनी केला. 

शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, प्रशासनाच्या नियोजनाअभावी शहरावर कृत्रिम पाणीसंकट निर्माण झाल्याचा आरोप करीत नगरसेवक व युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके यांनी भुतेश्‍वरनगरात आंदोलन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त "मुख्यमंत्र्यांना एक ग्लास पाणी भेट' असे बॅनर झळकावून अभिनव पद्धतीने आंदोलन केले. शहरातील अनेक भागांत जलवाहिन्यांना गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. जलवाहिन्याचे जाळे नसलेल्या भागांत पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरमधूनही पाणी वाहत आहे. शहरातील पाणीटंचाई अधिकाऱ्यांमुळे निर्माण झाली आहे. लवकरच ही कृत्रिम पाणीटंचाई दूर झाली नाही तर जनतेने आज अहिंसक मार्गाने आंदोलन केले; परंतु भविष्यात प्रशासनाविरोधात आक्रमक होऊन रस्त्यावर आंदोलन केले जाईल, असा इशारा बंटी शेळके यांनी दिला. 

आंदोलनात मालू बलकी, अर्चना कावळे, शकुंतला पिसे, सुमन पंचबुद्धे, छगुण राऊत, जैना पातरकर, शांता खोडके, छबू करवतकर, माधुरी ठवकर, कौशल्या दुरुगवार, गीता राऊत, जोत्स्ना नेरकर, कमल कायरकर, प्रमिला कुंभारे, रजनी रंधारे, शांता भोयर, गीता कढव, अश्विनी मातोरे, सुनीता चांदपूरकर, स्नेहल पंचबुद्धे, प्रभा कढव, मीना कुमारे, सुशीला कढव, कलावती चंधे, संध्या पंचबुद्धे यांच्यासह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com