शिवसेनेचे पहिले जिल्हाप्रमुख कुठे आहेत, कसे आहेत?, कुणी घेतंय का दखल...

हा व्यक्ती सध्या कुठे आहे आणि कसा आहे, याबाबत कुणालाही काही देणेघेणे आहे, असे वाटत नाही. आजही बाळासाहेबांच्या या सैनिकाची कुणाला आठवण आली नसती. पण आठवण आली ती त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर मांडलेल्या व्यथेमुळे.
Yashwant Upganlawar - Balasaheb Thackeray
Yashwant Upganlawar - Balasaheb Thackeray

यवतमाळ : महाराष्ट्राच्या राजकारणात यवतमाळ जिल्हा Yavatmal District in Maharashtra's Politics नेहमीच चर्चेत राहिला आहे आणि या जिल्ह्यातही दिग्रस तालुक्याची चर्चा सातत्याने होत असते. राजकारण असो, समाजकारण असो, अर्थकारण असो, उद्योग असो किंवा मग शैक्षणिक विषय, दिग्रस तालुका नेहमीच चर्चेत राहतो. आज चर्चा आहे ती, शिवसेनेच्या पहिल्या यवतमाळ जिल्हाप्रमुखाची… The First District Chief of Shiv Sena. 

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुका नेहमीच लक्षवेधी राहिला आहे. राजकारण असो, समाजकारण असो, अर्थकारण असो , उद्योग असो किंवा मग शैक्षणिक विषय असो दिग्रस तालुका नेहमीच चर्चेत राहतो. आज चर्चा आहे ती एका अशा व्यक्ती बाबत की ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी कलाटणी देणाऱ्या एका संघटनेचा ध्वज हाती घेतला होता. हा व्यक्ती सध्या कुठे आहे आणि कसा आहे, याबाबत कुणालाही काही देणेघेणे आहे, असे वाटत नाही. आजही बाळासाहेबांच्या या सैनिकाची कुणाला आठवण आली नसती. पण आठवण आली ती त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर मांडलेल्या व्यथेमुळे.

महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या शिवसेनेतील जुनी मंडळी सध्या कुठे आहे, याची चर्चा फारशी होत नाही आणि त्यांची दखलही कुणी घेत नाही. या पक्षाकरिता एकेकाळी स्वतःचे आयुष्य वाहून घेतलेले माजी जिल्हा प्रमुख यशवंत उपगनलावार यांची सध्या राजकीय सक्रियता दिसत नाही. १९९० मध्ये जेव्हा ते दिग्रस विधानसभेसाठी शिवसेनेचे उमेदवार होते, त्यावेळेस शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे २० मार्च १९९० ला त्यांच्या प्रचारासाठी दिग्रसला आले होते. ही बाब दिग्रस येथील वरिष्ठ शिवसैनिक पूनम पाटील यांनी सांगितली. 

त्या वेळेस या निवडणुकीमध्ये यवतमाळ जिल्ह्याचे पहिले शिवसेना जिल्हाप्रमुख यशवंत उपगनलावार यांच्याबद्दल असे म्हणता येईल की, राजकारणाच्या पुस्तकातील नवीन पान उघडल्या गेलं की जुनं पान क्वचितच उघडून पाहिल्या जाते. तशीच स्थिती यशवंत यांच्याबद्दल झालेली दिसून येत आहे. १९९० मध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या, तेव्हा यशवंत उपगनलावार दिग्रस-आर्णी विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार होते. यशवंत उपगनलावार यवतमाळ जिल्ह्याचे पहिले शिवसेना जिल्हाप्रमुख आहेत. परंतु सध्याच्या राजकारणामध्ये मागील अनेक दिवसापासून चर्चेत नाहीत. 

याचा अर्थ असा नाही की त्यांनी शिवसेना सोडून दिली. त्याचे कारण काही ही असो, परंतु शिवसेनेच्या जडण-घडणीमधील यवतमाळ जिल्ह्याचे त्यावेळेस त्यांचे योगदान विसरता येणार नाही. परंतु सध्या यशवंत उपगनलावार आहेत कुठे, कसे आहेत. या बाबत त्यांची शिवसेने कडून विचारणा होईल की नाही, असे प्रश्न त्यांचे कुटुंबीय विचारत आहेत. त्याचे कारण ही तसेच आहे. सध्या त्यांच्या कुटुंबातील सदस्य धनंजय याने सोशल मीडियावर या बाबत हाक दिली आहे. ती ही खुद्द शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना. याबद्दल दूरध्वनीवर धनंजय यांना विचारले असता त्यांनी ही खंत व्यक्त केली. ते म्हणतात, ज्या पक्षासाठी त्यांनी मेहनत घेतली, त्यांच्या कडून साधी विचारणा देखील होत नाही. 

बाकी काही नको, किमान विचारपूस तरी व्हावी. ही अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे काय, असे त्यांनी बोलून दाखविले. नक्कीच याबाबत विचार होणे गरजेचे आहे. आपला कार्यकर्ता टिकला पाहिजे, जुळला पाहिजे, जुळून राहिला पाहिजे, हे शिवसेनेचे धोरण राहिले आहे. यशवंत उपगनलावार यांच्या बाबत शिवसेना काय सिद्ध करेल हे पुढे कळेलच. पण शिवसेनेत जुन्या निष्ठावानांना सातत्याने डावलले जात असल्याची जी ओरड होते, त्यामध्ये कुठेतरी सत्यांश आहे, ही धनंजय यांनी मांडलेल्या व्यथेमुळे समोर आले आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com