काय चाललंय आघाडीत?; कॉंग्रेस आमदाराची सेना-राष्ट्रवादीवर सडकून टिका…

महाविकास आघाडीतील घटक पक्षांपैकी एक काँग्रेस आमदाराने इतर दोन पक्षांवर केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे.
Abhijeet Wanjari
Abhijeet Wanjari

चंद्रपूर : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते वारंवार ठासून सांगताहेत की, कुणी काहीही करू दे, हे सरकार पूर्ण पाच वर्ष चालेल म्हणजे चालेल. पण तिन्ही पक्षांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा सुरू केल्यापासून महाविकास आघाडीत धुसफुस वाढली आहे. नुकतीच विदर्भातील कॉंग्रेसच्या एका आमदाराने ओबीसी आरक्षणाच्या प्रश्‍नावर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर गंभीर आरोप केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. Serious allegations anainst shivsena and ncp creates quite stir.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे कॉंग्रेसचे आमदार अभिजित वंजारी काल कॉंग्रेसच्या ओबीसी सेलच्या कार्यक्रमासाठी चंद्रपूरात आले होते. यावेळी आयोजित बैठकीत ओबीसी आरक्षणासंबंधात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेला दोष दिला. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. आमदार वंजारी म्हणाले, शिवसेनेची भूमिका ओबीसींप्रती संदिग्ध आहे आणि राष्ट्रवादीचीही भूमिका स्पष्ट आहे. ते ओबीसींसोबत नाहीत, त्यांच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व नेत्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे.

ओबीसींच्या प्रति राष्ट्रवादीच्या सद्भावना राहू शकत नाहीत. म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. मग उरतात कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्ष. यांपैकी भाजपने आतापर्यंत ओबीसींना केवळ वापरून घेण्याचेच काम केले आहे. गेल्या सात वर्षांत देशातल्या लोकांनी, महाराष्ट्रातल्या लोकांना त्यांना अजमावून बघितले आहे. ओबीसींनी आतापर्यंत त्यांना पूर्णपणे तपासून घेतले आहे. भाजपने आतापर्यंत ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसण्याचेच काम केले आहे. त्यामुळे ओबीसींसाठी तारणहार कोणता पक्ष असेल तर तो फक्त आणि फक्त कॉंग्रेसच आहे, असे रोखठोक मत आमदार वंजारी यांनी व्यक्त केले. 

शिवसेना-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष ओबीसींच्या प्रश्नावर आस्थेवाईक नाहीत, असे खळबळजनक मत व्यक्त केलेले आमदार वंजारी हे नागपूर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मदतीनेच निवडून आले आहेत. त्यांनी असे धक्कादायक मत व्यक्त करणे म्हणजे या दोन्ही पक्षांप्रति कृतघ्नता असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी चंद्रपुरात काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या कार्यक्रमात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसवर ओबीसीविरोधी असल्याची टीका केली. शिवसेनेची ओबीसीबाबत भूमिका संदिग्ध आहे. राष्ट्रवादीची भूमिका विरोधी आहे, असे म्हणत घरचा अहेर दिला आहे. 

भाजप ओबीसींना केवळ मतासाठी वापरून घेते. भाजप पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करतो, असेही मत त्यांनी व्यक्त केले.  महाविकास आघाडीतील घटक पक्षांपैकी एक काँग्रेस आमदाराने इतर दोन पक्षांवर केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. आमदार वंजारी यांच्या विजयासाठी शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करत भाजपचा बालेकिल्ला उध्वस्त केला. मात्र अवघ्या आठ महिन्यांतच आमदार वंजारी यांनी मित्र पक्षांना घरचा आहेर दिला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आता नवीन वाद सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com