काय डेअरींग आहे तुम्हा लोकांची, आयुक्त अन् जिल्हाधिकाऱ्यांनाही विचारत नाही…

विभागीय क्रीडा संकुलामध्ये कोणत्याही पद्धतीचा हलगर्जीपणा असू नये. तसेच खेळांमध्ये कोणत्याही पद्धतीचे राजकारण आणू नये, अशा स्पष्ट सूचना आणि आदेश पालकमंत्री ठाकूर यांनी दिले आहेत.
Yashomati Thakur
Yashomati Thakur

अमरावती : काय डेअरींग आहे बाबा तुम्हा लोकांची, आयुक्तांना तुम्ही विचारत नाही, अन् जिल्हाधिकाऱ्यंनाही नाही विचारत. थेट कामे करूनच मोकळे होता. मानायला पाहिजे तुमच्या हिमतीला, असे म्हणत पालकमंत्री यशोमती ठाकूर Guardian Minister Yashomati Thakur यांनी आज अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. शेतकऱ्यांची वीज कापताना तर तुम्ही इंग्रजांसारखेच वागता. यापुढे एकाही शेतकऱ्याची वीज कापू नका, असा दमही पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिला. The guardia minister also told the officers that don't cut of the power of any farmers. 

शेतकऱ्यांकडून वीजबिल वसुली करताना सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवा. थेट वीज जोडणी कापून इंग्रजांसारखे वागू नका, असा सज्जड इशारा पालक मंत्री यशोमती ठाकूर यांनी ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. आज अमरावतीत वीज विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. पालकमंत्री ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना देत प्रसंगी पालकमंत्री ठाकूर यांनी त्यांची कानउघाडणीही केली. अमरावतीतील शेतकऱ्यांकडून वीज बिल वसुली करताना सर्व रक्कम देण्याचा तगादा अधिकाऱ्यांकडून लावला जातो तसेच शेतकऱ्यांची वीज जोडणी कापली जाते अशा अनेक तक्रारी पालक मंत्री ठाकूर यांच्याकडे आल्या होत्या. 

पाठपुरावा करताना कोरोनाच्या संकटामध्ये शेतकऱ्यांकडून जी असेल ती रक्कम स्वीकारा, ऊर्जा विभागावर ताण येतो आहे, याची माहिती आहे. मात्र वीज बिल वसुली करताना शेतकऱ्यांसाठी इंग्रजांसारखे वागू नका. शक्य तितक्या नॉर्मल प्रक्रिया पार पाडा, अशा सूचना ठाकूर यांनी वीज विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, अमरावती विभागीय क्रीडा अधिकाऱ्यांची  ठाकूर यांनी चांगलीच कान उघाडणी केली अमरावती विभागीय क्रीडा संकुलात नेमलेल्या प्रशिक्षकांच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त करत परस्पर नेमणुका केल्यामुळे पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. 

विभागीय क्रीडा संकुलामध्ये कोणत्याही पद्धतीचा हलगर्जीपणा असू नये. तसेच खेळांमध्ये कोणत्याही पद्धतीचे राजकारण आणू नये, अशा स्पष्ट सूचना आणि आदेश पालकमंत्री ठाकूर यांनी दिले आहेत. अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार न करता खेळाच्या आणि खेळाडूंच्या हिताचा विचार करून विभागीय संकुलामध्ये कारभार करावा. अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही पालकमंत्री ठाकूर यांनी यावेळी दिला. अधिकारी जिल्हाधिकारी किंवा आयुक्तांनाही न जुमानता कारभार करीत असल्याबाबत पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com