झेंडावंदनापुरते असलेले विश्वजित कदम भंडाऱ्याला वेळ देणार का ?

या आपत्तीत तातडीने मदतकार्य करून इतर बालकांचा जीव वाचविणाऱ्या परिचारिका आणि वार्डबॉयचाही त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यावेळी उपस्थित होते.
Vishwajeet Kadam - Rajesh Tope
Vishwajeet Kadam - Rajesh Tope

नागपूर : जिल्हा सामान्य रुग्णालयात आज पहाटे हृदय हेलावून टाकणारी घटना घडली. आग लागल्याने १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. दिवसभर राज्याच्या मंत्र्यांनी भंडाऱ्याला भेटी देऊन पाहणी केली, आढावा घेतला, सूचना केल्या. पण या जिल्ह्याचे पालकमंत्री विश्‍वजित कदम हे दिवसभर कुणालाही दिसले नाही. कारण ते आलेच नाहीत. पण देशभर या घटनेचे पडसाद उमटले. मुख्यमंत्र्यांपासून तर पंतप्रधानांपर्यंत सर्वांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला. नंतर सायंकाळी ५ ते ५.३० वाजताच्या सुमारास पालकमंत्री भंडाऱ्यात आले. त्यानंतर ‘झेंडावंदना’पुरते असलेले विश्वजित कदम भंडाऱ्याला वेळ देणार का, असा प्रश्‍न जिल्हावासीयांकडून विचारला जात आहे. 

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला भेट दिली, पाहणी केली आणि कामाचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री असायला हवे होते, अशा प्रतिक्रीया धरण परिसरात व्यक्त होत होत्या. पण ‘काल त्यांच्या वडीलांची जयंती होती म्हणून आले नव्हते’, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जळीत प्रकरणातील  बालकांच्या मृत्यूच्या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. बेफिकिरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

भंडारा जिल्हा रुग्णालयाला आज दुपारी भेट दिल्यानंतर मंत्री टोपे बोलत होते. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले  आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यावेळी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयातील घटनास्थळाची पाहणी करताना त्यांनी आगीचे नेमके कारण, रुग्णालयाचे  फायर एक्स्टींग्विश आणि इतरही सुरक्षात्मक बाबींचे ऑडिट अशा सर्व बाबींची ही समिती चौकशी करेल. या समितीत संबंधित विषयांचे तज्ञ समाविष्ट करण्यात आले आहेत.

स्ट्रक्चरल, फायर आणि एक्स्टींग्विश ऑडिट आणि रुग्णालयात नेमका स्फोट होण्याची कारणांबाबतही ही समिती शासनाला अहवाल सादर करेल, असे सांगून मंत्री टोपे म्हणाले की, ही घटना अतिशय दुर्दैवी आणि हृदयद्रावक आहे. मृत पावलेल्या बालकांच्या कुटुंबियांच्या भावना मी समजू शकतो. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी ही समिती गठित केली आहे. या घटनेशी संबंधित सर्व संबंधितांची तसेच प्रत्यक्षदर्शींचीही समितीसोबतच पोलिसांकडूनही चौकशी केली जाणार आहे. बेफिकीरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. 

या आपत्तीत तातडीने मदतकार्य करून इतर बालकांचा जीव वाचविणाऱ्या परिचारिका आणि वार्डबॉयचाही त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी आरोग्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दालनात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

बालकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन
भोजापूर येथील गीता विश्वनाथ बेहरे यांचे बाळ या घटनेत दगावले आहे. आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com