उद्धव ठाकरेंनी कधीकाळी घरी जाऊन समजूत घातलेला शिवसेना नेता राष्ट्रवादीत !

अधिकृत उमेदवारी न मिळाल्यामुळे आपण निवडून येणार नाही, हे त्यांनाही माहिती होते. पण यावेळी त्यांनी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारापेक्षा जास्त मते घेण्याची शर्यत लावली. येथे त्यांना आमदार व्हायचे नव्हते.
Shekhar Sawarbandhe
Shekhar Sawarbandhe

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर, शिवसेना नेते व माजी जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे Shivsena Leader and Former District chief Shekhar Sawarbandhe यांनी काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल Senior Leader of NCP यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. सन २०१४ मध्ये त्यांनी सेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंड केले होते. सेनेच्या अधिकृत उमेदवारापेक्षा जास्त मते घेईन, असा पण त्यांनी केला होता आणि ते जिंकलेही. पण निवडणूक मात्र हरले आणि सेनेच्या उमेदवारालाही पाडले. 

शिवसेनेत त्यांच्यावर अन्याय झाला, ही बाब काही राजकीय जाणकारही मान्य करतात. शिवसेनेत येण्यापूर्वी ते कॉंग्रेसमध्ये होते. तेथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे ट्युनिंग काही जुळले नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती असताना २०१० ते २०१२ या कालावधीत त्यांनी नागपूरचे उपमहापौरपद भूषविले. त्यापूर्वी २००४ मध्ये त्यांनी पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे हेवीवेट नेते व माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांच्या विरोधात निवडणूक लढविली. चतुर्वेदी यांना काट्याची टक्कर देत त्यांनी तब्बल ८४ हजार मते घेतली होती. त्यानंतर मात्र त्यांच्या आमदारकीचा योग आजतागायत जुळून आलेला नाही. 

उद्धव ठाकरेंनी शमवले बंड...
सन २००९ मध्ये शिवसेनेकडून उमेदवारी देण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे यांनी सावरबांधेंना शब्द दिला होता. भाजप-शिवसेना युतीमध्ये ही जागा तेव्हा सेनेसाठी सुटली होती. त्यांनी प्रचाराला धडाक्यात सुरूवातही केली. पण शेवटच्या क्षणी काय झाले माहिती नाही. अचानक किशोर कुमेरिया यांना सेनेचा अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आले. सावरबांधेंचा पुरता हिरमोड झाला. तेव्हा त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आणि अपक्ष उमेदवारी दाखल केली. उद्धव ठाकरे तेव्हा नागपुरात उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. त्यांनी घरी जाऊन सावरबांधेंची समजूत काढली आणि पुढच्या वेळी उमेदवारी नक्की तुम्हालाच देऊ, अशा शब्द देत त्यांचे बंड थंड केले होते. नंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत सावरबांधे कुमेरियांच्या प्रचाराच्या मंचावर गेले. कुमेरिया ती निवडणूक हरले, हा भाग वेगळा. पण येथे सावरबांधेंच्या आशा उंचावल्या होत्या आणि ते २०१४ वर्ष उगवायची वाट बघत शिवसेनेत काम करीत राहिले. 

उद्धव ठाकरेंनी नाही पाळला शब्द...
२०१४ हे वर्ष आले आणि विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली. आपली उमेदवारी यावेळी पक्की हे गृहीत धरून सावरबांधेंनी आधीपासूनच तयारी करून ठेवली होती. त्यावेळी युती आणि आघाडी दोन्ही तुटल्या होत्या. चारही प्रमुख पक्ष स्वतंत्र मैदानात उतरले होते. उद्धव ठाकरेंनी शब्द दिला असल्यामुळे यावेळी कुठेही दगा होण्याची सुतराम शक्यता नव्हती. सर्व तयारी झाली. यावेळी माशी कुठे शिंकली, हे कुणालाही कळले नाही आणि किरण पांडव हे शिवसेनेची तिकीट घेऊन नागपुरात आले. खुद्द उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द यावेळी पडला. हा आघात मात्र सावरबांधे सहन करू शकले नाही आणि त्यांनी बंडखोरी करीत दंड थोपटले आणि मैदानात उतरले. 

पण जिंकला…
अधिकृत उमेदवारी न मिळाल्यामुळे आपण निवडून येणार नाही, हे त्यांनाही माहिती होते. पण यावेळी त्यांनी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारापेक्षा जास्त मते घेण्याची शर्यत लावली. येथे त्यांना आमदार व्हायचे नव्हते, तर शिवसेनेच्या उमेदवाराला मागे टाकून पक्षश्रेष्ठींचा निर्णय चुकला, हे सिद्ध करायचे होते. ते त्यांनी केलेसुद्धा. किरण पांडव यांना १२००० मते पडली, तर शेखर सावरबांधे यांनी १४ हजार मते मिळवून आपला पण पूर्ण केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com