...तर डायनासोरसारखे शिवसैनिकही नामशेष होऊन जातील !

महाविकास आघाडीचे सरकार असताना आणि त्यातही मुख्यमंत्री सेनेचे असताना आमच्यावर हा अन्याय होतो आहेत. ज्यांचे जनतेमध्ये काम आहे, ज्यांच्यासोबत लोक जुळलेले आहेत, त्यांना डावलून केवळ चमकोगिरी करणाऱ्यांना पुढे केले जात आहे.
Shivsena
Shivsena

नागपूर : परवा परवा नागपूरच्या राजकारणात मोठी घडामोड झाली. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे Shivsena's Former District President Shekhar Sawarbandhe यांनी एकाएकी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये NCP प्रवेश घेतला. त्यानंतर नागपूर शहर आणि जिल्ह्यातच नव्हे तर मुंबईपर्यंत त्याचे पडसाद उमटले. नागपूर शहरात जी परिस्थिती आहे, ग्रामीणची स्थितीही त्यापेक्षा काही वेगळी नाही. सेनेत हेच प्रकार सुरू राहिले, तर भविष्यात डायनासोरसारखे शिवसैनिकही नामशेष होऊन जातील, अशी जळजळीत प्रतिक्रिया ग्रामीणमधील एका कट्टर शिवसैनिकाने दिली. 

नागपूर ग्रामीणमधील ‘या’ शिवसैनिकांच्या म्हणण्याप्रमाणे, शिवसेनेत आता केवळ चमचेगिरी करणाऱ्यांचा भरणा झालेला आहे. बाळासाहेबांनी तयार केलेल्या जुन्या, निष्ठावान शिवसैनिकांना हेतुपुरस्सर डावलले जात आहे. मागील काही काळापासून सैनिकांमध्ये असंतोष धगधगत आहे. हे एक बरे झाले की, शहरातील सेनेचे नेते शेखर सावरबांधे यांनी होत असलेली घुसमट बाहेर काढून वेगळी वाट धरली. त्यांच्यानंतर आता आम्हीसुद्धा काही निर्णय घ्यावा, या विचाराप्रत आलेलो आहोत. लवकरच येथेही शिवसेनेला गळती लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

शेखर सावरबांधे यांनी शिवबंधन तोडल्याने शिवसेनेमध्ये चांगलीच खळबळ उडाली. या घटनेची मुंबईतून दखल घेण्यात आली असून नागपूरमधील उफाळून आलेल्या असंतोषाचे कारण काय, अशी विचारणा माजी पदाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. सावरबांधे यांच्यापाठोपाठ अनेक पदाधिकारी सेना सोडण्याच्या तयारीत आहेत. यात एका नगरसेवकाचाही समावेश असल्याचे कळते. स्थानिक नेत्यांमुळे अनेक पदाधिकारी अस्वस्थ आहेत. मोठी पदे दिली तर त्यांना निर्णय घेण्याचे अधिकारसुद्धा देण्यात आले नाही. काहींना मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी बोलण्यासही मनाई करण्यात आल्याचे समजते. शिवसेनेत राहुनच फसलो, अशी भावना आता अनेक पदाधिकारी खासगीत व्यक्त करीत आहेत. त्यामुळे कुठल्याही क्षणी शिवसेनेत मोठा स्फोट होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. 

संपर्कप्रमुख की खासदारांचे सालदार ?
रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवसेनेचे आहेत. त्यांचे सैनिकांकडे, त्यांच्या कामांकडे आणि एकूणच जनतेकडे अजिबात लक्ष नाहीये. संपर्कप्रमुख म्हणून पक्षाने ज्यांच्यावर रामटेक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे, ते अमरावतीचे आहेत आणि इकडे फिरकतही नाहीत. खासदारांचे सालदार असल्यासारखीच त्यांची वर्तणूक असल्याचे सांगत शिवसैनिक आपल्या मनातील घुसमट बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसतात. गेल्या २० - २५ वर्षांपासून निष्ठेने काम करणाऱ्या सैनिकांना डावलून दुसऱ्या पक्षांमधून आयात केलेल्यांना पदांची खिरापत वाटली जात असल्याचा गंभीर आरोपही सैनिक करत आहेत. 

युवा सेनेचे पदाधिकारी ४५ वर्षांचे…
युवा सेनेचे पदाधिकारी आता वयाची पंचेचाळीशी पार करत आहेत. पण कार्यकारिणी बदलण्यात आली नाही. काही ठिकाणी तर पदाधिकारी सापडत नाहीयेत. जो तालुकाप्रमुख आहे, तोच उपजिल्हाप्रमुख म्हणूनही काम पाहतो. येवढी दयनीय अवस्था पक्षाची झाली आहे, की पदाधिकारीही सापडेनासे झाले. आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री असूनही आम्हाला त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे अशा पक्षात आता यापुढे न राहिलेलेच बरे, असेही हताश झालेले शिवसैनिक सांगतात. 

नागपूर जिल्ह्याच्या एका तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेची समिती तयार करण्यात आली आणि त्यामध्ये एकही शिवसैनिक नाही. तरीही खासदार, संपर्कप्रमुख आणि मोठ्या पदाधिकाऱ्यांचे त्याकडे लक्ष नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना आणि त्यातही मुख्यमंत्री सेनेचे असताना आमच्यावर हा अन्याय होतो आहेत. ज्यांचे जनतेमध्ये काम आहे, ज्यांच्यासोबत लोक जुळलेले आहेत, त्यांना डावलून केवळ चमकोगिरी करणाऱ्यांना पुढे केले जात आहे. आपल्या परिसरातील काम घेऊन राज्यातील एखाद्या मंत्र्याकडे गेल्यास पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवला जातो, हा म्हणजे पक्ष करीत असलेल्या अन्यायाचा कळसच झाला, असेही एका शिवसैनिकाने सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com