आगीतून बचावलेल्या सात शिशूंना सुरक्षित स्थळी हलविले  - the seven babies rescued from the fire were moved to the safe place | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

आगीतून बचावलेल्या सात शिशूंना सुरक्षित स्थळी हलविले 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 9 जानेवारी 2021

भंडारा नगर परिषद, सुरक्षा कर्मचारी व पोलिस पथकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासोबतच ती इतरत्र पसरु नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आग पूर्णत: विझविण्यात आलेली असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. 

नागपूर : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डात लागलेल्या अचानक आगीत 17 नवजात शिशूपैकी 7 शिशूंना वैद्यकीय चमू व  अग्निशमन विभागाच्या चमूंनी तात्काळ बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले. या दुर्घटनेत 10 शिशू मृत पावले आहेत.  

जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डात (एसएनसीयु) येथे रात्री उशिरा आग लागली. भंडारा नगर परिषद, सुरक्षा कर्मचारी व पोलिस पथकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासोबतच ती इतरत्र पसरु नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आग पूर्णत: विझविण्यात आलेली असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डात 17 नवजात शिशू दाखल झाले. त्यापैकी 10 शिशू मरण पावले असून त्यांच्या मातांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
1 - आईचे नाव - हिरकन्या हिरालाल भानारकर  (मृतबालक-स्त्री) रा. उसगाव (साकोली), 2 - आईचे नाव - प्रियंका जयंत बसेशंकर (मृतबालक-स्त्री) रा. जांब (मोहाडी),  3 - आईचे नाव - योगिता विकेश धुळसे   (मृतबालक-पुरुष) रा. श्रीनगर पहेला (भंडारा), 4- आईचे नाव - सुषमा पंढरी भंडारी (मृतबालक-स्त्री) रा. मोरगाव अर्जुनी (गोंदिया), 5 - आईचे नाव - गिता विश्वनाथ बेहरे (मृतबालक-स्त्री) रा. भोजापूर (भंडारा), 6 - आईचे नाव- दुर्गा विशाल रहांगडाले (मृतबालक-स्त्री) रा. टाकला (मोहाडी), 7 - आईचे नाव - सुकेशनी धर्मपाल आगरे (मृतबालक-स्त्री) रा. उसरला (मोहाडी), 8 - आईचे नाव - कविता बारेलाल कुंभारे (मृतबालक-स्त्री) रा. सितेसारा आलेसूर (तुमसर), ९ - आईचे नाव - वंदना मोहन सिडाम (मृतबालक-स्त्री) रा.रावणवाडी (भंडारा), 10 - अज्ञात (मृतबालक-पुरुष). संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नऊ शिशूंचे मृतदेह संबंधित नातेवाईकांकडे सोपविण्यात आले आहेत.  

सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या बालकांमध्ये एका जुळ्यांचा समावेश आहे. यामध्ये 1 - आईचे नाव - शामकला शेंडे  (बालक-स्त्री), 2 - आईचे नाव - दीक्षा दिनेश खंडाते (बालक - स्त्री (जुळे), 3 - आईचे नाव - अंजना युवराज भोंडे (बालक-स्त्री), 4 - आईचे नाव - चेतना चाचेरे (बालक-स्त्री), 5 - आईचे नाव - करीश्मा कन्हैया मेश्राम (बालक-स्त्री),  6 - आईचे नाव - सोनू मनोज मारबते (बालक-स्त्री).
बालकांच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीसंदर्भातील प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्तीव्यवस्थपन प्राधिकरणाचे अध्यक्ष संदीप कदम यांनी सादर केला आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख