Bacchu Kadu
Bacchu Kadu

जी भूमिका पंतप्रधानांनी घ्यायला पाहिजे होती, ती सर्वोच्च न्यायालयाने घेतली...

बऱ्याच वेळा असे पाहण्यात येते की न्यायालयाकडून निर्णय घेण्यात मागेपुढे होते. पण या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अगदी योग्य निर्णय घेतला आहे. आम्ही निर्णयाचे स्वागत करतो. पण हा निर्णय पूर्ण नाही आणि होऊच शकत नाही.

नागपूर : केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने योग्य निर्णय दिला आहे. पण हीच भूमिका केंद्र सरकारने घेतली असती तर जनतेचा आणि विशेषकरून शेतकऱ्यांचा सरकारबद्दलचा :आदर वाढला असता, असे राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले. 

बच्चू कडू म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयामुळे आमचा अर्धा विजय झाला आहे. पण केंद्र सरकार काय करते आहे, हे कळायला मार्ग नाही. न्यायालयाने फटकार लावल्यानंतरही सरकारचे डोळे उघडलेले दिसत नाहीये. लाखो शेतकऱ्यांचा लढ्यानंतर सरकारनेच कायदे रद्द करायला पाहिजे होते. आता न्यायालयाने अंमलबजावणीला स्थगिती देणे म्हणजे शेतकरीच बरोबर आहेत, त्यांचे आंदोलन योग्य आहे, हे सिद्ध होते. त्यामुळे हा प्रश्‍न अधिक न चिघळवता सरकारने गपगुमान अन्याकारक काळे कृषी कायदे रद्द करावे. 

बऱ्याच वेळा असे पाहण्यात येते की न्यायालयाकडून निर्णय घेण्यात मागेपुढे होते. पण या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अगदी योग्य निर्णय घेतला आहे. आम्ही निर्णयाचे स्वागत करतो. पण हा निर्णय पूर्ण नाही आणि होऊच शकत नाही. त्यामुळे काळे कृषी कायदे रद्द होईपर्यंत शेतकऱ्यांची लढाई सुरूच राहणार आहे. आम्ही न्याय मिळेपर्यंत सर्व शक्तिनिशी शेतकऱ्यांसोबत आहोत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर तरी केंद्र सरकारने बोध घेतला पाहिजे, अशी अपेक्षा बच्चू कडू यांनी व्यक्त केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com