PSI ची आत्महत्या; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिस दलात खळबळ

पोलिस आयुक्त डॅा. आरती सिंह यांनी सहायक पोलिस आयुक्तांवर या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी सोपवली आहे.
PSI Anil Mule suicide case audio clip goes viral
PSI Anil Mule suicide case audio clip goes viral

अमरावती : फ्रेजरपुरा ठाण्यात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक अनिल मुळे यांनी तीन दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यानंतर त्यांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली असून त्यात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा उल्लेख केल्यानं पोलिस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिस आयुक्त डॅा. आरती सिंह यांनी सहायक पोलिस आयुक्तांवर या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी सोपवली आहे. (PSI Anil Mule suicide case audio clip goes viral)

मुळे यांनी रहाटगाव रिंगरोडवरील एका झाडावर गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांची एकासोबत झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावरून व्हायरल झाली आहे. या क्लीपमध्ये ते रडत असल्याचा आवाज येत असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नुकसान केल्याचं समोरच्या व्यक्तीला सांगत आहेत. रजेवरून परत आल्यानंतर पुन्हा कामावर हजर करून घेतलं नाही, असं संभाषण आहे. 

या क्लिपमध्ये उपायुक्त व सहाय्यक पोलिस आयुक्तांची नावे घेतल्याचे समोर आलं आहे. त्यामुळं पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही क्लिप 25 जून रोजीची आहे. पण या व्हायरल क्लिप प्रकरणात कोणतेही चौकशीचे आदेश आयुक्तांनी दिलेले नाहीत. सोशल मीडियावरून बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात, असं त्यांचं म्हणणं आहे. 

उपनिरीक्षक मुळे यांनी आत्महत्या कोणत्या कारणांमुळं केली, याचा शोध मात्र घेतला जाणार आहे. त्यासाठी सहायक पोलिस आयुक्तांकडून हा तपास केली जाईल. मुळे यांच्या आत्महत्येनंतर पोलिस वर्तुळात याप्रकरणाची बरीच चर्चा सुरू झाली. मुळे यांच्या आत्महत्येप्रकरणात पोलिसांनी प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. याप्रकरणी नांदगावपेठ पोलिसांनी त्यांच्या कुटुंबातील काही जणांचे जबाबही घेतले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com