गडकरी म्हणाले, तुम्ही संधी दिल्यामुळेच भारतभरात मोठमोठी कामे करु शकलो..

अनेक अशक्य कल्पना शक्य व्हाव्यात, यासाठी माझी कामे सुरु असतात, असे सांगताना गडकरी म्हणाले की, शेतकऱ्याने निर्माण केलेल्या इंधनावर वाहने चालावी व हे शहर आणि देश प्रदूषणमुक्त व्हावा
gadkari satkar
gadkari satkar

नागपूर : नागपूरकरांनी मला संधी दिल्यामुळेच मी नागपुरात आणि भारतभरात मोठमोठी कामे करू शकलो. नागपुरातही आज डबल डेकर पूल बांधला, फुटाळ्यावर जागतिक दर्जाचे कारंजे होणार आहेत, ब्रॉडगेज मेट्रोही लवकरच लोकांच्या सेवेसाठी येणार आहे. ही सर्व कामे लोकांमुळेच होऊ शकली, त्यामुळे या कामाचे श्रेय नागपूरकरांचे आहे, असे भावपूर्ण उद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. 

पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे नितीन गडकरी यांना नलिनी बाळकृष्ण देवपुजारी स्मृती जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. शक्तिपीठ रामनगर येथे झालेल्या या कार्यक्रमाला तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचन गडकरी, पद्मगंधा प्रतिष्ठानच्या शुभांगी भडभडे, कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. पंकज चांदे, डॉ. सतीश देवपुजारी आदी उपस्थित होते. सामाजिक क्षेत्रातही अनेक गरीब लहान मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया, अपंगांना कृत्रिम पाय लावून देण्यास मदत केली. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचा मी भरपूर प्रयत्न केला, पण त्या कामात अजून पाहिजे तेवढे यश मिळाले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

गावागावात आज परिस्थिती खूप खराब आहे. म्हणून गावांचा विकास करण्याचे मी ठरविले आहे. मागास क्षेत्र आणि शेतकरी यांचा आर्थिक व सामाजिक विकास झाला पाहिजे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अनेक अशक्य कल्पना शक्य व्हाव्यात, यासाठी माझी कामे सुरु असतात, असे सांगताना गडकरी म्हणाले की, शेतकऱ्याने निर्माण केलेल्या इंधनावर वाहने चालावी व हे शहर आणि देश प्रदूषणमुक्त व्हावा, असे माझे प्रयत्न आहेत. तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालक प्रभा देऊस्कर यांनी केले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com