गडकरींनी केला गौप्यस्फोट, म्हणाले दिल्लीत यायला तयार नव्हतो, जबरदस्तीने आलो…

राज्याची सर्व जबाबदारी घ्यायची आहे. कोणत्याही कामामध्ये तफावत करण्याचे कारण नाही. कारण देश हा सर्वांचा आहे. माझ्यासकट आज सर्वांना केंद्रात जे मंत्रिपद मिळाले, ते महाराष्ट्राचे राजदूत म्हणून काम करण्यासाठी मिळाले आहे.
Nitin Gadkari
Nitin Gadkari

नागपूर : महाराष्ट्राच्या विकासासाठी माझे अनेक स्वप्न आहेत. सरकार कुणाचेही असो, राजकीय लढाई वेगळी आणि विकासाचे प्रश्‍न वेगळे आहेत. आपल्या महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा विकास झाला पाहिजे, हाच माझा नेहमी प्रयत्न राहिला आहे. मी दिल्लीत यायला अजिबात तयार नव्हतो. अपघाताने आलो आहे, जबरदस्ती मला दिल्लीत पाठवण्यात आले, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. Nitin Gadkari said that, I was sent to delhi by force. 

नुकतेच केंद्रात मंत्री झालेले भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील यांच्या आयोजित एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. ते म्हणाले, मराठी सारस्वताचा आणि मराठी माणसाचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. औद्योगिक क्रांतीमध्ये आपण पुढे आहोत. इतिहास, साहित्य, संस्कृती आदी सर्वच क्षेत्रांत आपण पुढे आहोत. अशा सर्व क्षेत्रांमध्ये वावर असलेल्या भागवत कराड यांची केंद्रीय मंत्री म्हणून निवड झाली. कराड संभाजीनगरचे उत्तम कार्यकर्ते आहेत. ज्यावेळी कराड महानगरपालिकेत होते, त्यावेळी शिवसेना आणि भाजपमध्ये अशी काही परिस्थिती होती की, भाजपचा महापौर होणे शक्यच नव्हते. 

त्यावेळी येथील सर्व मंडळी माझ्याकडे आली आणि म्हणाली की, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंकडे जा, ते आता तुमचंच ऐकतील. बाळासाहेबांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. मी बाळासाहेबांना विनंती केली, जरी आमचे संख्याबळ महानगरपालिकेत कमी आहे, तरीही कराडसारख्या माणसाला संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे आपण कृपया आमची विनंती मान्य करावी, असे बाळासाहेबांना सांगितले. बाळासाहेबांनी मोठ्या मनाने कराड यांना महापौर बनवण्याला परवानगी दिली आणि कराड महापौर झाले, अशी आठवण नितीन गडकरी यांनी दिलखुलासपणे बोलताना सांगितली. 

गडकरी म्हणाले, एक डॉक्टर म्हणून, फार्मासीटीकल कंपनी म्हणून आणि एक माणूस म्हणूनही कराड यांचे व्हिजन फार चांगले आहे. भारती पवार यांनाही आज एक चांगली संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातला कोणताही मंत्री हा महाराष्ट्राचा ॲम्बेसेडर आहे. आपल्याला देशासाठी काम तर करायचेच आहे. पण जेथून आपण निवडून येतो, तिथली चिंता आधी करायची आहे. मतदारसंघात आणि विभागात चांगले काम करायचे आहे.

राज्याची सर्व जबाबदारी घ्यायची आहे. कोणत्याही कामामध्ये तफावत करण्याचे कारण नाही. कारण देश हा सर्वांचा आहे. माझ्यासकट आज सर्वांना केंद्रात जे मंत्रिपद मिळाले, ते महाराष्ट्राचे राजदूत म्हणून काम करण्यासाठी मिळाले आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघासाठी, विभागासाठी आणि महाराष्ट्रासाठी काम करण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला दिली आहे, त्याचा पुरेपूर वापर करून विकास करणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. 
 Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com