आजचा वाढदिवस : रणजित देशमुख, माजी मंत्री.

पहिल्यांदा ते रामटेक विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. नंतर नंतर १९९० च्या दशकात ते विदर्भासाठी स्वतंत्र राज्य होण्यासाठीच्या चळवळीत सहभागी झाले होते. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतही ते राहिले.
Aajcha Wadhdiwas - Ranjeet Deshmukh
Aajcha Wadhdiwas - Ranjeet Deshmukh

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील वडविहिरा या छोट्याशा गावातून पुढे आलेले नेतृत्व म्हणजे रणजित देशमुख. RanJeet Deshmukh सन १९७० मध्ये रणजित देशमुख युवा नेता म्हणून राजकारणात सक्रिय झाले. राष्ट्रीय युवक कॉंग्रेसचे ते प्रमुख होते. He was the head of the National Youth Congress दिवंगत नेते संजय गांधी Sanjay Gandhi यांच्यासोबत त्यांनी काम केलेले आहे. पहिल्यांदा ते सावनेर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. Ramtek was elected MLA from the Assembly constituency नंतर नंतर १९९० च्या दशकात ते विदर्भासाठी स्वतंत्र राज्य होण्यासाठीच्या चळवळीत सहभागी झाले होते. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतही ते राहिले. पण नंतर विलासराव देशमुख Vilasrao Deshmukh यांना मुख्यमंत्रिपद मिळाले. 

रणजित देशमुख यांनी ग्रामीण विकासापासून अनेक कॅबिनेट पोर्टफोलिओ ठेवले. ज्यात त्यांनी गावोगावी स्वच्छता मोहीम, शिक्षण, तांत्रिक शिक्षण, आरोग्य, कृषी आणि वस्त्रोद्योगात महत्त्वपूर्ण योगदान दिले. जवळपास दोन दशके ते राज्यात कॉंग्रेसप्रणीत सरकारमध्ये होते. सन २००४ मध्ये त्यांनी नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. पण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा पराभव केला. ते महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे दोन टर्म अध्यक्ष व माजी मंत्री होते. 

नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रणजितबाबू देशमुख यांचे विदर्भाच्याच नव्हे तर राज्याच्या विकासातील योगदान अनन्यसाधारण आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या निष्ठावंतांच्या मांदियाळीतील अग्रस्थानी असलेले हे नाव. वडविहिरासारख्या गावातून येऊन राष्ट्रीय पातळीवर आपल्या कर्तृत्वाच्या भरवशावर राजकारण, समाजकारण  आणि आरोग्य क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. त्यांनी नेहमी लोकाभिमुख राजकारण केले. गेल्या ४० वर्षांपासून नागपूर जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव राहिला आहे. कार्यकर्त्यांशी संपर्क व प्रशासनावरील पकड यामुळे त्यांनी नागपूर जिल्ह्याच्या राजकारणात अद्यापही आपला प्रभाव कायम राखला आहे. 

राजकारण व समाजकारण करीत असताना त्यांनी ग्रामीण भागातील आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन सुदृढ आरोग्याची चळवळ उभी केली. त्यांनी लावलेला आरोग्यसेवेचा वृक्ष आज वटवृक्ष झाला आहे. रणजित बाबू यांची राजकीय कारकीर्द संघर्षमय राहिली. मात्र  न डगमगता आपल्या मतांसाठी, मागण्यांसाठी ते नेहमी आग्रही राहिले. त्यानुसारच तडजोड न करता कर्तव्य बजावत राहिले. त्यांनी केवळ विकासाचेच राजकारण केले असे नाही तर विदर्भवासींयाच्या न्याय हक्कांसाठी आजही ते कार्यरत आहेत. १९७० पासून म्हणजे विद्यार्थी दशेपासून युवक कॉंग्रेसची धुरा सांभाळणारे रणजितबाबू माणसांचे पारखी आहेत. एवढंच नव्हे तर माणसं जोडणं हा विदर्भाच्या मातीचा गुण त्यांच्या कृतीतून, आचरणातून कायम दिसतो. दिवंगत काँग्रेस नेते संजय गांधींचे निकटवर्तीय असलेल्या रणजितबाबू यांनी काँग्रेस रुजविली आणि वाढविली. त्यांच्या नेतृत्वाची झलक महाराष्ट्रालाच नाही तर देशालाही दिसली. 

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील वडविहिरा या गावातून नरखेड पंचायत समितीचे सदस्य म्हणून रणजितबाबू  यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. १९७९ ते १९८४ या काळात ते जिल्हा परिषद नागपूरचे अध्यक्ष होते. ग्रामीण भागातून आलेल्या धडाडीचा कार्यकर्ता जिल्हा परिषद कसा सांभाळू शकतो, याचे आदर्श उदाहरण म्हणजे त्यांची कारकीर्द आहे. पंचायतराज सुधारणा समितीवर ग्रामीण क्षेत्रातून एक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या निवडीची तरतूद होती. त्यात रणजित देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. ग्रामीण विकासाचा पोटतिडकीने पुरस्कार करणारे तरुण नेते  म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या धडाकेबाज कामाची परिणती म्हणून कॉंग्रेस पक्षाने त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना १९८५ मध्ये विधानसभेसाठी उमेदवारी दिली. त्यानंतर विदर्भाच्या राजकारणातला हा नेता राज्याच्या राजकारणात आला आणि आपली छाप सोडली. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com