आजचा वाढदिवस : प्रवीण कुंटे पाटील - todays birthday praveen kunte patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : प्रवीण कुंटे पाटील

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

नागपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत असताना विद्यमान गृहमंत्री अनिल देशमुख व तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना कार्याध्यक्ष पदाची जवाबदारी दिली होती, ती त्यांनी समर्थपणे सांभाळून संघटन कौशल्याचा परिचय दिला.

प्रवीण कुंटे यांचा जन्म नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील येनीकोनी या गावात सन 1966 ला झाला. तिसरीपर्यंत शिक्षण तेथेच झाले. त्यानंतर आठवीपर्यंतचे शिक्षण रामटेकला झाले. यानंतर १०वी पर्यंत नरखेड येथे ते शिकले. १९८२ मध्ये वर्धा जिल्ह्यातील पिपरी सिविल अँड रुरल इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये १९८२ मध्ये शिकत असतानाच शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या संपर्कात ते आले आणि त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन शेतकरी आंदोलनात उडी घेतली. मग त्यानंतर शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकऱ्यांच्या मुलांच्या माध्यमातून मांडण्याकरिता विद्यार्थी शेतकरी संघटनेचे नेतृत्व केले. 

दरम्यान त्याच काळात रामटेक तालुक्यात शरद पवार यांच्या नेतृत्वात एस कॉंग्रेस युवक शाखेचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचे पुत्र चौधरी अजितसिंग, माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांचे पुत्र सुनील शास्त्री यांच्यासोबत शेतकरी चळवळीत राष्ट्रीय स्तरावर काम केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून कुठलेही लाभाचे पद न घेता फक्त संघटनेचे कामते करीत आहेत. आज पूर्ण विदर्भात प्रवीण कुंटे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कुशल संघटक, निष्णात निरीक्षक, प्रखर वक्ता आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. 

नागपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत असताना विद्यमान गृहमंत्री अनिल देशमुख व तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना कार्याध्यक्ष पदाची जवाबदारी दिली होती, ती त्यांनी समर्थपणे सांभाळून संघटन कौशल्याचा परिचय दिला. म्हणून आज त्यांच्याकडे पक्षश्रेष्ठींनी प्रदेश सरचिटणीस, प्रदेश प्रवक्ता तीन जिल्ह्याच्या निरीक्षकाची जबाबदारी सोपवली आहे.  (Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख