नागपूर दक्षिणच्या `गडावर' चुरस

लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एक लाख 14 हजार मते मिळवून देणाऱ्या दक्षिण नागपूर मतदारसंघात आज मतदानाच्या दिवशी मात्र चुरस दिसून आली.
नागपूर दक्षिणच्या `गडावर' चुरस

नागपूर - लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एक लाख 14 हजार मते मिळवून देणाऱ्या दक्षिण नागपूर मतदारसंघात मतदानाच्या दिवशी मात्र चुरस दिसून आली. 

भाजपचे मोहन मते व कॉंग्रेसचे गिरीश पांडव यांच्यात थेट लढतीचे चित्र दक्षिण नागपुरात दिसून आले. अपक्ष प्रमोद मानमोडे, सतीश होले व किशोर कुमेरिया हे तिघेही किती मते घेणार, यावरच मते व पांडव यांचे भवितव्य अवलंबून असल्याची चर्चा मतदार संघात रंगली.

मागील निवडणुकीत कॉंग्रेसकडून भाजपने दक्षिणचा गड खेचून आणला. मात्र, हा गड कायम राखण्यासाठी भाजपने संपूर्ण तयारी केली होती. मतदानाच्या दिवशी सायंकाळपर्यंत विजयासाठी भाजपसह कॉंग्रेसचीही चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र दिसले. सकाळपासून उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. दक्षिण नागपुरातील मतदारांचा कानोसा घेतला असता कुठल्याही एका पक्षासाठी किंवा उमेदवारासाठी विजय सहज नसल्याचेच दिसून आले. भाजपचे मते व कॉंग्रेसचे पांडव यांच्यात तुल्यबळ लढतीचेच येथील मतदारांच्या चर्चेतून पुढे आले. 

मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या काही मतदारांनी अपक्ष प्रमोद मानमोडे यांच्या विजयाचे दावे केले तर सोमवारी क्वार्टर आदी भागातील नागरिकांनी सतीश होले व भाजप यांच्यातच लढत असल्याचे सांगितले. 

काही नागरिकांनी मते, पांडव, होले, मानमोडे, कुमेरिया यांच्यात चुरस असल्याचे सांगितले. त्यामुळे दक्षिणचा गड कोण सर करणार? याबाबत मतदारांनाही उत्सुकता आहे.

तीन लाख 82 हजार 338 मतदार या मतदारसंघात आहेत. लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांना येथून 43 हजारांची आघाडी मिळाली होती. विधानसभेत ही आघाडी कायम ठेवण्यात भाजपला यश मिळेल की कॉंग्रेस कुरघोडी करणार? हे येत्या गुरुवारी समजणार आहे. तोपर्यंत येथील भाजप व कॉंग्रेस समर्थकांसह उमेदवारांचीही धाकधूक वाढली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com