nagpur politics | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ विदर्भवाद्यांची निदर्शने 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 मे 2017

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील धरमपेठ भागातील निवासस्थानाजवळ निदर्शने केली. या निदर्शकांना पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले. 

नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील धरमपेठ भागातील निवासस्थानाजवळ निदर्शने केली. या निदर्शकांना पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले. 

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विदर्भवाद्यांनी काल सकाळी कॉफी हाउस चौकात निदर्शने केली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. विदर्भवाद्यांची संख्या मात्र फारच कमी होती. भाजपने विदर्भाच्या नावावर मते मागितली आहेत. आता मात्र भाजपने स्वतंत्र विदर्भाचा विषय सोडून दिल्याची टीका या वेळी करण्यात आली. 

विदर्भासाठी "रक्ताक्षरी' 
विदर्भ राज्य आघाडी या संघटनेतर्फे विदर्भ राज्याचा ध्वज फडकाविला तसेच विदर्भाच्या मागणीच्या निवेदनावर रक्ताने स्वाक्षरी करण्यात आली. या संघटनेचे अध्यक्ष व राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या हस्ते हा ध्वज फडकविण्यात आला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतंत्र राज्याच्या मागणीचे निवेदन तयार करण्यात आले. या निवेदनावर रक्ताने स्वाक्षरी करण्यात आल्या. या वेळी माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, संदेश सिंगलकर, ऍड. रवी सान्याल, मुकेश समर्थ, सूरज लोलगे आदी उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख