Nagpur politics | Sarkarnama

"गो कॅशलेस' गीत नागपुरात गुंजणार 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 एप्रिल 2017

येत्या 14 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये नागपुरात भव्य डीजी धन मेळावा होणार आहे. या कार्यक्रमात कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी "गो कॅशलेस' गीत गायिले जाणार आहे. 

नागपूर : येत्या 14 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये नागपुरात भव्य डीजी धन मेळावा होणार आहे. या कार्यक्रमात कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी "गो कॅशलेस' गीत गायिले जाणार आहे. 

या गाण्याचे बोल आहेत. 
अब बिजली की तार जैसी, लंबी कतार नही 
कडी धूप मे जनता बेजार नही 
छुट्टोंकी तंगी की, कोई तकरार नही 
मेरी सरकार जैसी कोई सरकार नही 

विदर्भात सध्या उष्णतेची जोरदार लाट आली आहे. जवळपास 43-44 अंश सेल्सिअसच्या दरम्यान पारा दररोज जात आहे. या उन्हाच्या तडाख्याने जनता मात्र बेजार झाली आहे. कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी शासकीय व निमशासकीय संस्थाही सहभागी होणार आहेत. डिजिटल व्यवहाराला प्राधान्य देणाऱ्या व उल्लेखनीय कार्य केलेल्या बॅंका व संस्थांचा सत्कारही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.  

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख