नागपुरात सुरु झाले पोलिस किचन - Nagpur Police Started Kitchen for Needy | Politics Marathi News - Sarkarnama

नागपुरात सुरु झाले पोलिस किचन

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 एप्रिल 2020

नागपूर शहर पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा गरजू आणि कामगारांना फूड पॅकेटस आणि अन्नधान्याचे पाकिटे वाटण्यात सुरुवात केली आहे. यामध्ये सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अरविंद सराफ यांनी पुढाकार घेतला आ

नागपूर : लॉकडाऊन दरम्यान नागरिक रस्त्यावर येऊ नये, म्हणून पोलिस सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. शहरातील गरिब, गरजू आणि इतर राज्यातून आलेल्या माथाडी कामगारांची काळजी पोलिसांकडून घेण्यात येत आहेत. पोलिसांनी अशा गरजू लोकांसांठी 'पोलिस किचन'ची सुरवात केली असून या माध्यमातून अन्नाचे वितरण करण्यात येत आहे. या कामी सेवानिवृत्त पोलीसही सरकावले आहेत. 

शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या माध्यमातून फूड पॅकेट्सचे वितरण करण्यात आले. अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त निलेश भरणे, गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी शहरातील विविध ठिकाणी गरजूं आणि कामगारांपर्यंत जेवण पोहोचवले आहे.  मूळ गावी परतणारे स्थलांतरीत, रस्त्यावर भटकणारे व्यक्तींना एमआयडीसी पोलिसांकडून झोपडपट्टी मजूर लोकांना वाटप, सीताबर्डी, सक्करदरा आदी पोलिस ठाण्याच्या वतीने गरजुंना अन्नाचे वितरण करण्यात आले. तसेच जनतेमध्ये कोरोनाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, म्हणून दररोज वेगवेगळे सोशल अवेयरनेस फोटो, मॅसेजसुद्धा नागरिकांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप, पेसबूक आणि ट्विटरच्या माध्यमातून प्रसारीत करण्यात येत आहेत. 

सेवानिवृत्त पोलिसांचाही हातभार

नागपूर शहर पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा गरजू आणि कामगारांना फूड पॅकेटस आणि अन्नधान्याचे पाकिटे वाटण्यात सुरुवात केली आहे. यामध्ये सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अरविंद सराफ यांनी पुढाकार घेतला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख