नागपूर पोलीस झाले आक्रमक; सव्वातीन हजार जणावर कारवाई, वाहनांचीही जप्ती - Nagpur Police Became More Aggressive in Corona | Politics Marathi News - Sarkarnama

नागपूर पोलीस झाले आक्रमक; सव्वातीन हजार जणावर कारवाई, वाहनांचीही जप्ती

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 एप्रिल 2020

लॉकडाऊन आणि कलम 144 लागल्यानंतरही शहरात विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांविरूद्ध पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काल दिवसभरात तब्बल 3286 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच अनेकांची वाहने जप्त करण्यात आली

नागपूर : लॉकडाऊन आणि कलम 144 लागल्यानंतरही शहरात विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांविरूद्ध पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काल दिवसभरात तब्बल 3286 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच अनेकांची वाहने जप्त करण्यात आली असून काहींना रस्त्यावर पोलिसांनी चांगलाच चोप दिला.

सोमवारी 1734 वाहनचालकांविरुद्ध वाहतूक शाखा पोलिसांनी चालान कारवाई केली. सोमवारी वाहतूक शाखा पोलिसांनी कार व सात ऑटोरिक्षांसह 80 वाहनचालकांची वाहने जप्त केली. याशिवाय विनाकारण फिरणाऱ्या 126 नागरिकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. सायंकाळी त्यांची सुटका केली. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 12 नागरिकांविरुद्ध तर लॉकडाऊन असतानाही प्रतिष्ठाने उघडणाऱ्या पाच मालकांविरुद्धही पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे. 

काल दिवसभरात पोलिसांनी 123 जणांना विनाकारण फिरताना पकडले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसह चांगला चोपही देण्यात आला. नागरिकांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि फैलाव होऊ नये म्हणून लॉकडाऊन आणि कलम 144 चे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख