nagpur-parshivani-pratibha-kumbhalkar | Sarkarnama

पारशिवनीत शिवसेनेने भाजपला हात दाखविला 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 जुलै 2018

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी या नगरपंचायतीच्या नगरराध्यक्षपदी अनपेक्षितपणे शिवसेनेने मुसंडी मारली असून जिल्ह्यात पहिल्याच नगरपंचायतीवर सेनेने कब्जा केला आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रतिभा कुंभलकर विजयी झाल्या. त्यांनी कॉंग्रेसच्या सुनीता डोमकी यांचा पराभव केला. 

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी या नगरपंचायतीच्या नगरराध्यक्षपदी अनपेक्षितपणे शिवसेनेने मुसंडी मारली असून जिल्ह्यात पहिल्याच नगरपंचायतीवर सेनेने कब्जा केला आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रतिभा कुंभलकर विजयी झाल्या. त्यांनी कॉंग्रेसच्या सुनीता डोमकी यांचा पराभव केला. 

पारशिवनी नगरपंचायतची ही पहिलीची निवडणूक होती. या निवडणुकीत भाजपला यश मिळेल, असा होरा होता. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपचे आमदार मल्लिाकार्जुन रेड्डी यांच्या मतदारसंघातील या शहरात भाजपला यश मिळण्याची आशा होती. परंतु सेनेने या शहरात अनपेक्षितपणे मुसंडी मारली. यात भाजप व कॉंग्रेसच्या उमेदवारावर मात केली. या निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवार सुनीता डोमकी दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या तर भाजपच्या डॉ. माधुरी बावनकुळे यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 

शिवसेनेचे माजी आमदार आशीष जयस्वाल यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविण्यात आली. या निवडणुकीत प्रतिभा कुंभलकर यांना 2400 मते मिळाली तर कॉंग्रेसच्या सुनीता डोमकी यांना 2200 मते मिळाली. केवळ 200 मतांच्या फरकांनी सेनेने कॉंग्रेसला पराजीत केले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख