nagpur-nisha-savarkar-ramesh-donekar | Sarkarnama

नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षा सावरकर, उपाध्यक्ष डोणेकर यांच्यात जुंपली

नीलेश डोये
शुक्रवार, 27 जुलै 2018

नागपूर  : नागपूर जिल्हा परिषदेच्या सभागृहाला कोणाचे नाव द्यायचे, यावरून भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे पदाधिकारी आमनेसामने आले आहेत. जिल्हा परिषदेच्या सभागृहास संत गाडगेबाबा यांचे की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यायचे यावरून जि. प. अध्यक्ष निशा सावरकर आणि उपाध्यक्ष शरद डोणेकर यांच्या चांगलीच जुंपली आहे. दोघेही आपला हट्ट सोडण्यास तयार नसल्याने यावरून राजकारण तापणार आहे.

जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहाजवळ नवीन सभागृह तयार करण्यात येत आहे. या सभागृहाला गाडगे महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय बांधकाम समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बांधकाम समितीचे सभापती उपाध्यक्ष डोणेकर आहेत. डोणेकर हे शिवसेनेचे आहेत. अध्यक्षा निशा सावरकर मात्र या सभागृहाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यासाठी आग्रही आहेत. 

निशा सावरकर या भाजपच्या आहेत. बांधकाम समितीच्या बैठकीत गाडगे महाराजांचे नाव देण्याचा निर्णय झाल्याने उपाध्यक्षही नाव बदल्यास तयार नाही. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या सरपंच भवन येथील लॉनच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अध्यक्षांनी आधी नाव जाहीर करा त्याशिवाय लॉनचे उद्‌घाटनच करणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. मात्र उपाध्यक्षांनी सभागृहाला संत गाडगे महाराजांचे नाव देण्याचा निर्णय झाला असल्याने लॉनला सावित्रीबाईचे नाव देण्याची सूचना केली. अध्यक्षांनी ही सूचना धुडकावून लावल्याचे समजते. 

समितीच्या बैठकीत निर्णय झाल्याने उपाध्यक्ष निर्णय बदल्यास तयार नाही तर अध्यक्षा सभागृहाला सावित्रीबाई फुलेंचे नाव देण्यासाठी अडून बसल्या आहेत. बांधकाम समितीच्या बैठकीतही हा विषय गाजला. त्यामुळे सभागृहाला आणि लॉनला कोणते नाव मिळते, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख