महापालिकेत 'वॉर' सुरुच : महापौर म्हणाले, आयुक्त ऐकत नाहीत, आयुक्त म्हणतात, माहिती घेऊन बोलावे!  - Nagpur News War Continues in Nagpur Between Municipal commissioner and Mayor | Politics Marathi News - Sarkarnama

महापालिकेत 'वॉर' सुरुच : महापौर म्हणाले, आयुक्त ऐकत नाहीत, आयुक्त म्हणतात, माहिती घेऊन बोलावे! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 22 एप्रिल 2020

महापौर संदीप जोशी व आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील शीतयुद्ध गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मागील महिन्यात लक्ष्मीनगर येथील शिक्षकांच्या एका बैठकीत महापौर जोशी यांनी आयुक्तांचे नाव न घेता हिटलशाही सुरू असल्याचे ताशेरे ओढले होते. आज एका वाहिनीवर मुलाखत देताना महापौर संदीप जोशी यांनी निगेटीव्ह आणि पॉझिटीव्ह रुग्ण विलगीकरणात एकाच ठिकाणी ठेवल्यामुळे पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे कुणालाही न विचारता परस्पर निर्णय घेत असल्याचा गंभीर आरोप केला.

नागपूर : शहरात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढत असतानाच आयुक्त तुकाराम मुंढे व महापौर संदीप जोशी यांच्यात वाक्‌युद्ध सुरू झाले. महापौर संदीप जोशी यांनी आयुक्तांवर ऐकत नसल्याचा आरोप केला तर आयुक्तांनी सर्व कामे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार होत असून प्रतिक्रिया देताना माहिती घेऊन द्यावी, असा प्रतिहल्ला चढविला. 

महापौर संदीप जोशी व आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील शीतयुद्ध गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मागील महिन्यात लक्ष्मीनगर येथील शिक्षकांच्या एका बैठकीत महापौर जोशी यांनी आयुक्तांचे नाव न घेता हिटलशाही सुरू असल्याचे ताशेरे ओढले होते. आज एका वाहिनीवर मुलाखत देताना महापौर संदीप जोशी यांनी निगेटीव्ह आणि पॉझिटीव्ह रुग्ण विलगीकरणात एकाच ठिकाणी ठेवल्यामुळे पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे कुणालाही न विचारता परस्पर निर्णय घेत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर आयुक्तांनी केंद्र, राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वाचे पूर्णत: पालन होत असल्याचे सांगितले. एखादी व्यक्ती पॉझिटीव्ह आढळून आल्यास त्या व्यक्तीसह त्याच्या संपर्कातील नागरिकांना विलगीकरणात ठेवले जात आहे. शक्‍यतो यांना स्वतंत्र खोलीत ठेवले जाते. परंतु, जेथे अशी व्यवस्था नाही. तिथे रुग्णांना मोठ्या हॉलमध्ये ठेवेल जात असल्याचे ते म्हणाले. 

शहरातील आमदार निवास, रवि भवन, वनामती आदी ठिकाणी निगेटिव्ह आणि पॉझिटीव्ह रुग्ण एकाच ठिकाणी ठेवण्यात आले आहे. दरम्यान, रुग्णांच्या नमुने तपासणीला प्रशासनाकडून प्राधान्य दिले जात नाही. 
- संदीप जोशी, महापौर. 

एका व्यक्तीपासून 45 लोकांना लागण झाली. वेळेतच प्रशासनाने पाऊल उचलले नसते तर शहराची परिस्थिती काय असती, याची कल्पना केली जाऊ शकते. प्रतिक्रीया देताना योग्य प्रकारे दिली पाहीजे. 
- तुकाराम मुंढे, आयुक्त. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख