युवक काँग्रेसने पक्षाकडे मागितल्या ६० जागा 

Satyajeet Tambe
Satyajeet Tambe

नागपूर : कॉंग्रेसमधील बरेच ज्येष्ठ नेते पक्ष सोडून जात आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून अडून असलेल्या जागा रिकाम्या होत आहेत. युवक कॉंग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आता चांगली संधी आहे आणि आम्ही या संधीचे सोने करु. त्यासाठी युवक कॉंग्रेससाठी आम्ही विधानसभेच्या ६० जागा मागितल्या असल्याचे सत्यजित तांबे यांनी येथे सांगितले.

कॉंग्रेस पक्षावर नेहमीच घराणेशाहीचा आरोप लावला जातो. परंतु, आज प्रत्येक पक्षात घराणेशाही आहे. भाजपामध्ये पंकजा मुंडे, पुनम महाजन, अशी कित्येक नावे घेता येतील. इतर पक्षात थेट तलवार देऊन, घराण्याचा युवराज घोषित केला जातो. पण कॉंग्रेसमध्ये घराणेशाही लोकशाहीच्या माध्यमातून रुजविली असल्याचे ते म्हणाले. मी निवडणुक जिंकून युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष झालो. कुणी तलवार देऊन मला अध्यक्ष केलेले नाही, असा टोलाही त्यांनी हाणला. राज्यातील युवकांसाठी 'वेक अप महाराष्ट्र' या उपक्रमाच्या निमीत्ताने ते नागपुरात आले असताना ते पत्रकार परीषदेत ते बोलत होते. 

प्रथमच कॉंग्रेस पक्ष युवकांचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. त्यासाठी राज्यभर वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून युवा जागर करण्यात येत आहे. युवक कॉंग्रेस राज्यभर 'वेक अप महाराष्ट्र' हे अभियान राबवित आहे. यात 'मैं भी नायक - सीएम फॉर ए डे' या संकल्पनेतून एक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 16 ते 30 वयोगटातील तरुणांना मुख्यमंत्र्यांकडून असलेल्या अपेक्षा किंवा मी मुख्यमंत्री झालो तर काय करणार? हे व्यक्त करण्यासाठी हा व्यासपीठ आहे. यात प्रत्येक जिल्ह्यातून ३ विजयी तरुणांची निवड करून, मुंबईमध्ये या स्पर्धेची अंतिम फेरी होईल. यातील 5 विजेत्यांना एक दिवसाचे मुख्यमंत्री बनून पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेशातील मुख्यमंत्र्याबरोबर दिवसभर राहून कामकाज पाहण्याची संधी मिळणार आहे, असे तांबे यांनी सांगितले.  

युवकांच्या जाहीरनाम्याचे हे पाच विजेते 'अॅम्बेसेडर' राहणार आहेत. 'वेक अप महाराष्ट्र' अंतर्गत पाच कोटी युवकांपर्यंत युवक कॉंग्रेस पोहोचणार आहे. युवकांचे अभिप्राय, त्यांच्या संकल्पना घेऊन युवकांचा स्वतंत्र जाहीरनामा पक्ष काढणार आहे, अशी माहिती तांबे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com