मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात ते एकटेच; एकाही इच्छुकाचा दावा नाही

शहरात भाजपचे शंभरावर उमेदवार लढण्यास इच्छुक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्‍चिम आणि आमदार कृष्णा खोपडे यांच्या पूर्व नागपूरमधून एकाही इच्छुकाने लढण्याचा दावा केला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार खोपडे हे विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार म्हणून बिनविरोध निवडले गेले आहेत.
Devendra Phadanavis
Devendra Phadanavis

नागपूर : शहरात भाजपचे शंभरावर उमेदवार लढण्यास इच्छुक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्‍चिम आणि आमदार कृष्णा खोपडे यांच्या पूर्व नागपूरमधून एकाही इच्छुकाने लढण्याचा दावा केला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार खोपडे हे विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार म्हणून बिनविरोध निवडले गेले आहेत. 

भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज रविभवन येथे घेण्यात आल्या. विधानसभाध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी मुलाखती घेतल्या. उत्तर, दक्षिण आणि पश्‍चिम नागपूरमध्ये अनेकांनी दावे केले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघासाठी एकाही इच्छुक मुलाखतीला आला नाही. मुख्यमंत्री स्वतः येथे उमेदवार असल्याने तशीही उमेदवारी अन्य कुणाला मिळण्याची शक्यता नव्हती. . महाजनादेश यात्रेदरम्यान नागपूरला आले असता त्यांनी आपण दक्षिण-पश्‍चिमेतूनच लढणार असे जाहीर केले होते. त्यामुळे येथील संभाव्य इच्छुकांचे तसेही पत्ते कट झाले होते. 

पूर्व नागपूरमध्ये आमदार कृष्णा खोपडे यांनी चांगले बस्तान बसविले आहे. लोकसभेत नितीन गडकरी यांना सर्वाधिक मताधिक्‍य पूर्व नागपूरनेच मिळवून दिले. खोपडे यांनी तेव्हा दिग्गज समजल्या जाणारे कॉंग्रेस नेते, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे संस्थान खालसा केले आहे. ते येथून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहे. असे असले तरी खोपडे यांचे पक्षांतर्गत विरोधक भरपूर आहेत. खाजगीत पूर्व नागपूर दावा करण्याच्या घोषणा अनेकांनी यापूर्वी केल्या होत्या. मात्र आज मुलाखतीसाठी यांपैकी कोणीही फिरकले नाही. मागील निवडणुकीत अरुण कोटेजा यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र यावेळी त्यांनीसुद्धा दावा केला नाही. यामुळे कृष्णा खोपडे यांची उमेदवारी निश्‍चित झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com