भाजप शहराध्यक्ष दटकेंचा नागपूर मध्य तर मते यांचा दक्षिणेवर दावा 

विधानसभेचे सभापती हरीभाऊ बागडे यांनी काल रविभवन येथे सहा विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. दक्षिण नागपूरमधून मोहन मते यांच्यासह, माजी उपमहापौर व सुधार प्रन्यासचे विश्‍वस्त रवींद्र भोयर, माजी नगरसेवक रमेश सिंगारे, देवेन दस्तुरे, बळवंत जिचकार, आशिष वांदिले, अर्चना डेहणकर, कैलाश चुटे, दीपक चौधरी यांनी प्रामुख्याने मुलाखती दिल्या.
Pravin Datke - Mohan Mate Nagpur
Pravin Datke - Mohan Mate Nagpur

नागपूर : माजी महापौर आणि भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी मध्य नागपूर तर माजी आमदार मोहन मते यांनी दक्षिण नागपूरवर दावा केला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघांत भाजपचेच आमदार आहेत. 

विधानसभेचे सभापती हरीभाऊ बागडे यांनी काल रविभवन येथे सहा विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. दक्षिण नागपूरमधून मोहन मते यांच्यासह, माजी उपमहापौर व सुधार प्रन्यासचे विश्‍वस्त रवींद्र भोयर, माजी नगरसेवक रमेश सिंगारे, देवेन दस्तुरे, बळवंत जिचकार, आशिष वांदिले, अर्चना डेहणकर, कैलाश चुटे, दीपक चौधरी यांनी प्रामुख्याने मुलाखती दिल्या. येथे सुधाकर कोहळे विद्यमान आमदार आहेत. मध्य नागपूरमध्ये भाजपचेच विकास कुंभारे आमदार आहे. येथून प्रवीण दटके, उपमहापौर दीपराज पारडीकर यांनी उमेदवारी मागितली आहे. 

पश्‍चिमसाठी इच्छुकांची प्रचंड गर्दी होती. यात महापौर नंदा जिचकार, दयाशंकर तिवारी, जयप्रकाश गुप्ता, भूषण शिंगणे, अश्‍विनी जिचकार, प्रगती पाटील, संगीता गिरे, रमेश चोपडे, दीपक चोप्रा आदींचा समावेश होता. उत्तरमधून तब्बल 16 जणांनी उमेदवारी मागितली. यात विद्यमान आमदार डॉ. मिलिंद माने, रमेश वानखेडे, संदीप जाधव, सुभाष पारधी, धर्मपाल मेश्राम, पंकज सोनकर, बबली मेश्राम, महेंद्र धनविजय, राजू बावरा, अविनाश धमगाये, संदीप गवई, मधुसूदन गवई, राजू हत्तीठेले, रमेश फुले, विभा ठवरे आणि बंडू पारवे यांचा समावेश होता. 

आमदारांची दांडी, बागडेंची नाराजी 
निवडणूक लढण्यास सर्व इच्छुकांना मुलखतीला बोलावले होते. मात्र, आमदार मिलिंद माने यांचा अपवाद वगळता एकाही आमदाराने मुलाखत दिली नाही. सर्व आमदार कोअर कमेटीच्या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर ते निघून गेले. त्यामुळे मुलाखती घेण्यास आलेले हरीभाऊ बागडे यांनी नाराजी व्यक्त केली. आपण स्वतः मुलाखत दिली, तर आमदारांना देण्यास काय हरकत होती, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. 

हे देखिल वाचा -

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com