चंद्रपुरातही 11 विदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल, धाडले क्वारंटाईनमध्ये

येथील तुकूम परिसरातील एका धार्मिस स्थळी आढळलेल्या 11 विदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांची विलगीकरण कक्षात रवानागी करण्यात आली आहे. त्यांना मिळालेल्या पर्यटन व्हिसाचा त्यांनी गैरवापर केल्यावरून ही कारवाई पोलिसांनी केली
Eleven Foreign Nationals Quarantined In Chandrapur
Eleven Foreign Nationals Quarantined In Chandrapur

चंद्रपूर : येथील तुकूम परिसरातील एका धार्मिस स्थळी आढळलेल्या 11 विदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांची विलगीकरण कक्षात रवानागी करण्यात आली आहे. त्यांना मिळालेल्या पर्यटन व्हिसाचा त्यांनी गैरवापर केल्यावरून ही कारवाई पोलिसांनी केली.

कोरोनाचा संसर्ग पसरु नये म्हणून प्रशासनाच्यावतीने कठोर अंमलबाजवणी केली जात आहे. विदेशी व परराज्यातून आलेल्या नागरिकांनी स्वत: माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. 25 मार्चला तुकूम परिसरातील एका धार्मिक स्थळी अकरा किरकीस्तानी आणि दिल्ली, ओडिसा येथील प्रत्येकी एक असे एकूण 13 जण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी प्रशासनाला माहिती दिली नाही. या कारणावरून या अकरा जणांना अटक करण्यात आली.

पर्यटनासाठीच्या व्हिसावर धार्मिक कार्यक्रमात सहभाग

मात्र त्यानंतर त्यांच्याकडे व्हिसा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले. दरम्यान त्यांच्याकडे असलेला व्हिसा हा पर्यटनासाठी असल्याची बाब समोर आली. मात्र ते धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याचे तपासात पुढे आले. त्यानंतर काल बुधवारी रात्री शहर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर विदेशी नागरिक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांना विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com