Nagpur news : Devendra Fadanvis birthday | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसासाठी नागपूर भाजपची लगबग 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 जुलै 2017

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस नागपुरात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी नागपूर शहर भाजपची लगबग सुरू झाली आहे. यासाठी खासदार, आमदार, नगरसेवक, माजी आमदार, माजी नगरसेवक तसेच भाजपच्या शहर कार्यकारिणीतील सदस्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. 

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस नागपुरात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी नागपूर शहर भाजपची लगबग सुरू झाली आहे. यासाठी खासदार, आमदार, नगरसेवक, माजी आमदार, माजी नगरसेवक तसेच भाजपच्या शहर कार्यकारिणीतील सदस्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. 

येत्या 22 जुलैला मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे वाढदिवसाला जाहिराती किंवा बडेजाव न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनीच केल्या होत्या. त्यामुळे गेल्यावर्षी नागपुरात वाढदिवसाला मोठे फ्लेक्‍स किंवा वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती प्रकाशित झाल्या नव्हत्या. नुकतीच शेतकऱ्यांना केलेली 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी, वर्षाच्या सुरूवातीला महापालिका व जिल्हा परिषदांमध्ये मिळालेले यश व अनेक विकास कामांच्या भूमिपूजनामुळे कार्यकर्त्यांनी यंदा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा मनसुबा केला आहे. 

खासदार, आमदार, माजी आमदार, नगरसेवकांसह भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीला नागपूर शहर भाजपचे अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे उपस्थित होते. यात मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविले. या वाढदिवसाला पक्ष विस्ताराची जोड दिली जाणार आहे. बुथ विस्तार योजनेची अंमलबजावणी नागपुरात सुरू आहे. बुथ विस्तार योजनेचा आढावा यावेळी घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांचा वाढदिवसानिमित्त नागपुरात करावयाच्या कार्यक्रमासाठी पुन्हा बैठक होणार आहे. मुख्यमंत्री वाढदिवसाला नागपुरात राहणार काय, याबद्दल निश्‍चित झालेले नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख